सृष्टी, अरिना, स्नेहल, नियती, प्रांजल अजिंक्य

- शासकीय शालेय मनपास्तर बुद्धिबळ स्पर्धा

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

सेंट झेवियर्स हायस्कूल येथे सुरु असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित शासकीय शालेय मनपास्तर बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षाखालील मुली गटात गुरुवारी झालेल्या सामन्यात सृष्टी, अरिना, स्नेहल, नियती, प्रांजल यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत अजिंक्यपद पटकविले. या स्पर्धेत १७ वर्षाखालील मुले गटात १४४ तर मुली गटात मुली ४० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नाेंदविला हाेता.


१७ वर्षाखालील मुली गटातील स्पर्धेचा अंतिम विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे, सृष्टी जोशीराव प्रायव्हेट हायस्कूल, अरिना मोदी, पोदार इंटरनॅशनल स्कूल, स्नेहल गावडे प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूल, नियती चोडणकर, म ल ग हायस्कुल, प्रांजल चव्हाण, श्री. वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कुल.


१७ वर्षाखालील मुले गटातील स्पर्धेचा अंतिम विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे, अरीन कुलकर्णी, विवेकानंद कॉलेज, राधेश्वर ठोंबरे न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल, सर्वेश पोतदार मेन राजाराम हायस्कूल, रुद्र बेवीनकट्टी, विद्यापीठ हायस्कुल, अंशुल चुयेकर, सेंट झेविअर्स हायस्कुल.
१४ वर्षाखालील मुले गटातील स्पर्धेचा अंतिम विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे, विवेक चित्रकार, तेजस मुक्त विद्यालय, अर्णव पाटील, न्यू हायस्कुल, अर्णव पोर्लेकर, न्यू हायस्कुल, अर्जित पाटील, श्री. वसंतराव जयवंतराव देशमुख इंग्लिश मिडीयम स्कुल, अन्वय भिवरे, श्रीमंत माईसाहेब बावडेकर अकॅडमी.
क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, किरण खटावकर, राहुल माने, उमेश पाटील तांत्रिक सहकार्य तर मुख्य पंच भरत चौगुले, आरती मोदी, मनिष म्हारूलकर, महेश व्यापारी, किरण शिंदे, माधुरी पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Our Visitor

5 4 8 5 4 5
Views Last 30 days : 77
Total views : 548918

You may also like

error: Content is protected !!