प्रतिकृतींतून धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाचा परिचय

धार्मिक, ऐतिहासिक स्थळांच्या प्रतिकृतींसह आकर्षक सजावटीने वेधले गणेश भक्तांचे लक्ष

(सर्व छाया – अप्पू ट्रेनर)

(कोल्हापूर : लोकमानस विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

शहरातील गणेशोत्सव मंडळांनी लक्षवेधी विविध साकारलेल्या प्रतिकृतींतून धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय करून देणाऱ्या आला आहे या प्रतिकृती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. साकारण्यात आलेल्या या प्रतिकृतींमध्ये शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील शिवतेज मित्र मंडळाने लोकमान्य टिळक आकर्षक आठ फुटांची गणेश मूर्ती घेउन येताना २२ फुट उंचीची प्रतिकृती, राधा कृष्ण मित्र मंडळ ट्रस्टने सातारा येथील श्री शाहू महाराजांच्या दरबाराची प्रतिकृती, स्वर्णमंदिर, सीता कुटी, ऐतिहासिक कल्याणगड, अमरनाथ मंदिर, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, जगन्नाथ पुरी आदींचा समावेश आहे.


    या मंडळांनी साकारल्या हुबेहुब लक्षवेधी विविध प्रतिकृती
रविवार पेठेतील दिलबहार तालीम मंडळाने बारा ज्योतिर्लिंग मंदिर साकारले असून, दौलतनगर येथील राजे संभाजी तरुण मंडळाने हैदराबाद येथील स्वर्णमंदिराची प्रतिकृती साकारली आहे. आपटेनगरमधील जोतिबा मंदिराजवळ वास्तव ग्रुपने नाशिक येथील त्र्यंबकेश्वरमधील सीता कुटीची प्रतिकृती उभारली आहे. शिवाजी पेठेतील नाथागोळे तरुण मंडळाने सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक कल्याणगडाची प्रतिकृती साकारली. पंचगंगा नदी रोडवरील मस्कुती तलाव तरुण मंडळाने अमरनाथ मंदिराची प्रतिकृती उभारली. राजारामपुरीतील शिवाजी तरुण मंडळाने जगन्नाथ पुरी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. शुक्रवार पेठेतील पंचगंगा तालीम मंडळाने कला महर्षी बाबुराव पेंटर यांना मानवंदना देणारी संकल्पना साकारली. कसबा बावड्यातील माळ गल्ली येथील जय भवानी तालीम मंडळाने तिरुपती येथील स्वर्णगिरी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. अनेक मंडळांनी आकर्षक शाही दरबार, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि विविध विषयांवरील देखावे साकारले आहेत. देखावे पाहण्यासाठी नागरिक आणि गणेशभक्तांची गर्दी होत आहे.


कोणते मंडळ, कोणती प्रतिकृती लक्षवेधी ?
■ शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील शिवतेज मित्र मंडळाने साकारली लाेकमान्य टिळक आकर्षक आठ फुटांची गणेश मूर्ती घेउन येताना २२ फुट उंचीची प्रतिकृती
■ शाहपुरीतील राधाकृष्ण मंडळाने साकारली सातारा येथील श्री शाहू महाराजांच्या दरबाराची प्रतिकृती
■ नाथागोळे तरुण मंडळ, शिवाजी पेठ : साताऱ्यातील ऐतिहासिक कल्याणगड
■ मस्कुती तलाव तरुण मंडळ, पंचगंगा नदी रोड : अमरनाथ मंदिर
■ दिलबहार तालीम मंडळ, रविवार पेठ : बारा ज्योतिर्लिंग मंदिर
■ पंचगंगा तालीम मंडळ, शुक्रवार पेठ : कला महर्षी बाबुराव पेंटर यांना मानवंदना
■ राजे संभाजी तरुण मंडळ, दौलतनगर : हैदराबाद येथील स्वर्णमंदिर
■ वास्तव ग्रुप, आपटेनगर : त्र्यंबकेश्वरमधील सीता कुटी
■ जय भवानी तालीम मंडळ, माळ गल्ली, कसबा बावडा तिरुपती येथील स्वर्णगिरी मंदिर

Our Visitor

5 4 8 5 9 4
Views Last 30 days : 67
Total views : 549013

You may also like

error: Content is protected !!