अंबाई जलतरण तलावाला अखेरची घरघर..!

- पावसाळ्यात सर्वत्र पाणीच पाणी तर जलतरण तलाव पडलाय कोरडा - जलतरण तलाव ५० वर्षांपुर्वीचा असून परिसरासह साहित्याची दुरावस्था, मुख्य प्रवेशव्दारासह कंपाउंडची पडझड - लाखो रुपये खर्चूनही दुरावस्थेमुळे मनपाला मिळणाऱ्या उत्पन्नाला अडीच वर्षांपासून लागलाय ब्रेक

(लोकमानस न्यूज : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

शहरात पावसाळ्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असताना अंबाई जलतरण तलाव कोरडा पडलाय. जलतरण तलाव गळतीसह परिसरात असलेल्या साहित्याची दुरावस्था झाली आहे. मुख्य प्रवेशव्दार कुलुपबंद असून कंपाउंडची पडझड झाली आहे. लाखो रुपये खर्चूनही परिस्थिती जैसे थे आहे. जलतरण तलावाच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या उत्पन्नाला गेल्या अडीच वर्षांपासून ब्रेक लागला आहे. सद्यस्थितीत अंबाई जलतरण तलावाला अखेरची घरघर लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


लाखो रूपयांच्या कमाईला अडीच वर्षांपासून ब्रेक
उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीच्या सुट्टीतील अबालवृध्दांच्या आवडीचे ठिकाण म्हणजे जलतरण तलाव असते. महानगरपालिकेच्या अंबाई जलतरण तलावात डुंबण्यासाठी सर्वसामान्यांना परवडणारा अत्यल्प तिकीट दर आकारण्यात येत होता. यामुळे दररोज पोहायला येणाऱ्यांसाठी तिकीट, महिना, सहा महिने व वार्षिक पास आदींची सोय होती. प्रचंड प्रतिसाद असल्यामुळे सर्व बॅच फुल्ल असायच्या यातून मनपाला यातून लाखो रुपयांची कमाई होत होती. जलतरण तलाव पुन्हा सुरु करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, ५० वर्षांपूर्वीचा जलतरण तलाव, जुने साहित्य असल्याने त्याची क्षमता संपली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जलतरण तलाव बंद असल्यामुळे मनपाला वर्षाला सुमारे २५ लाखांपेक्षा अधिक महसूल मिळत होता. कमाईपेक्षा गळतीच्या व इतर साहित्य दुरुस्तीच्या कामवर खर्च अधिक हाेउ लागला. गेल्या अडीच वर्षांपासून जलतरण तलाव वापराविना बंद राहिल्याने मनपाच्या लाखो रुपयांच्या कमाईला ब्रेक लागला आहे.


जलतरण तलावातील पाणी झाले गायब
पावसाळा सुरु असल्याने सध्या रंकाळा तलावाच्या पाण्याची पातळी वाढली आहे. याउलट परिस्थिती जलतरण तलावाची आहे. भर पावसातही जलतरण तलावातील पाणी गायब झाले आहे. नदी आहे उशाला अन् कोरड पडली घशाला.. अशा म्हणाीप्रमाणे अंबाई जलतरण तलावाची झाली आहे. महानगरपालिकेसह या भागातील लोकप्रतिनीधींचेही याकडे अक्षम्य दूर्लक्ष होत आहे. जलतरण तलावाचा विकास व्हावा, पुन्हा पु्र्ण क्षमतेने सुरु व्हावा, यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. यामुळे जलतरण तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

गळतीच्या काम, इतर साहित्य दुरुस्तीवर सुमारे ४० लाखांवर खर्च
चार ते पाच वर्षांपुर्वी गळतीच्या काम, इतर साहित्य दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. यावर सुमारे ४० लाखांवर खर्च करण्यात आला होता. यानंतर कसातरी एक वर्षभर जलतरण तलाव सुरु राहिला. यानंतर पुन्हा गळतीचा प्रश्न निर्माण झाला. ५० वर्षांपुर्वीचा जलतरण तलाव असल्याने उत्पन्नापेक्षा अधिक खर्च गळती व साहित्य दुरुस्तीवर होउ लागला. याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना इतर विभागात वर्ग करण्यात आले आहे. देखभार बंद झाल्याने जलतरण तलावाला अखेरची घरघर लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी यावर तत्काळ योग्य उपाययोजना तत्कार करावी, जलतरण तलाव सुस्थितीत सुरु करण्यात यावा, अशी मागणी सर्वसामान्यातून जोर धरली आहे.

Our Visitor

5 4 8 5 4 3
Views Last 30 days : 75
Total views : 548916

You may also like

error: Content is protected !!