एमसीए समितीच्या पात्र क्रिकेट पंचांसाठी हंगामापुर्व विशेष कार्यशाळा संपन्न

-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) अंतर्गत कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (केडीसीए)तर्फे कार्यशाळेचे आयोजन - कोल्हापूरसह सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग व रत्नागिरी या सहा जिल्हातील एकुण ४३ पंचांचा कार्यशाळेत सहभाग

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

आगामी क्रिकेट हंगामाच्या पार्श्र्वभूमीवर पंचाचे तांत्रिक ज्ञान निर्णय क्षमता आणि नियमामधील अचूकता अधिक सक्षम करण्यासाठी हॉटेल ॲट्रिया येथे दोन दिवसाीय अचुक तयारी (प्री­-सीजन प्रिपरेटरी वर्कशॉप फॉर अंपायर्स) कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) अंतर्गत कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (केडीसीए)तर्फे करण्यात आले होते.
या कार्यशाळेत कोल्हापूरसह सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग व रत्नागिरी या सहा जिल्हातील एकुण ४३ एमसीए समितीचे पंच सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे उदघाटन केडीसीएचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी केडीसीएचे सचिव मदन शेळके आणि सहसचिव डाॅ संजय पाठारे उपस्थित होते.
या दोन दिवसीय सत्रात आयपीएल व बीसीसीआयचे आंतरराष्ट्रीय पंच स्वरूपानंद कुन्नुर एमसीए पंच समितीचे सदस्य अजय देशपांडे तसेच बीसीसीआय समितीचे (पॅनेल) पंच रोहन इंगवले या अनुभवी पंचानी मार्गदर्शन सर्व सहभागी पंचाना मार्गदर्शन केले.


कार्यशाळेत क्रिकेटच्या आधुनिक नियमांमधील बदल सामन्यातील तणावाच्या प्रसंगी अचूक निर्णय घेण्याची पध्दत मैदानावरील पंचांमधील समन्वय आणि खेळाडूंशी सुसंवाद बाबत सविस्तर चर्चा केली. याशिवाय पंचाची शारिरीक व मानसिक तंदुरूस्ती आणि सामन्यापूर्वीच्या तयारीवर विशेष भर देण्याचे मार्गदर्शन केले. मैदानावरील प्रत्येक चेंडूवर पंचांचा निर्णय सामन्याचा निकाल बदलू शकतो. त्यामुळे अशा दर्जेदार प्रशिक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्पर्धांमधील पंचगिरी स्तर अधिक उंचावेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.


या कार्यशाळे दरम्यान दुस­या दिवशीच्या दुपारच्या सत्रात सिंबॉयसिस मेडीकल कॉलेज फॉर वुमनचे स्पोर्टस सायंन्टीस्ट मा डॉ अभिषेक देव व केडीसीएचे माजी अध्यक्ष आर ए (बाळ) पाटणकर यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी डॉ अभिषेक देव यांनी सर्व पंचाना मार्गदर्शन करताना पंचाना मैदानावर दिवसभर उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांना देखील खेळाडूंच्या इतकीच स्वत:ची शारीरीक व मानसीक आरोग्य मजबुत ठेवणेसाठी व्यायाम योगा व बौध्दीक आकलन शक्ती वाढवणेचे व्यायाम करणे जरूरीचे आहे., असे सांगीतले तसेच स्वत:ची कामगीरी उंचावण्यासाठी व ॲटी डोपिंग या विषयावर थोडक्यात माहीती दिली.

Our Visitor

5 4 8 5 4 5
Views Last 30 days : 77
Total views : 548918

You may also like

error: Content is protected !!