कोल्हापूर जिल्हा संघाकडे विजेतेपद

- कोल्हापूर मनपा संघावर ३ - ० गोलने मात - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आयोजित विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा

 कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

               जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आणि संजीवन नॉलेज सिटी, पन्हाळा यांचे सहकार्याने विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्हा संघाने कोल्हापूर मनपा संघावर ३ – ० गोलने मात करुन विजेतेपद पटकविले .
अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्हा संघाने कोल्हापूर मनपा संघावर ३ – ० गोलने मात केली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा संघाकडून पार्थ खवरेने वैयक्तीक दोन तर पोनशिबा खोमदरामने एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला .


विजयी कोल्हापूर जिल्हा संघ
कर्णधार शुभंकर भाटे, वीर पाटील, वेदांत माळी, श्रेयस कोरवी, पियुष गायकवाड, पार्थ खवरे, प्रीत भोसले, पुनशिबा थोये, जॅक्सन, रोनाल्डो, सार्थक हवलदार, आयुष जोशी, सोहम माळी . सदरच्या संघाला प्रशिक्षक अमित साळुंखे रणजीत विचारे व क्रीडाशिक्षक जयंत कुलकर्णी सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले .
तत्पूर्वी, झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर जिल्हा ( संजीवन विद्यालय पन्हाळा ) संघाने सिंधुदुर्ग जिल्हा (मिलाग्रीस हायस्कुल, सिंधुदुर्ग) संघावर ६ – ० गोलने एकतर्फी मात करुन अंतिम फेरीत धडक मारली . कोल्हापूर जिल्हा संघाकडून पुनाशिब्रा खोमद्रामने वैयक्तीक २ तर वेदांत माळी, थोय लवरेम्बम, प्रीत भोसले, टोईनखोबा नॉगमैथेम यांनी प्रत्येकी १ गोल करुन संघाला मोठा विजय मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान दिले .
दुसऱ्या उपांत्य सामनयात कोल्हापूर मनपा ( महाराष्ट्र हायस्कूल ) संघाने सातारा जिल्हा ( श्री शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल, फलटण ) संघावर २ – ० गोलने मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला . कोल्हापूर मनपा संघाकडून रणवीर पाटील, आराध्या चौगुले यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले .
तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सातारा जिल्हा संघाने सिंधुदुर्ग जिल्हा संघावर ३ – २ गोलने विजय मिळविला . सातारा संघाकडून राजवीर नाईक निंबाळकरने वैयक्तीक २, अनिरुद्ध काळेने १ तर सिंधुदुर्ग संघाकडून अल्टन गोम्स, आयुष गावडे यांनी प्रत्येकी एक गोल केला . या विजयामुळे सातारा जिल्हा संघाने स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकविला .
तत्पूर्वी, झालेल्या विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यांचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे,
१५ वर्षाखालील मुले गटातील स्पर्धा
पहिल्या सामन्यात कोल्हापूर जिल्हा ( संजीवन विद्यालय पन्हाळा ) संघाने सांगली मनपा ( अल्फोंसा स्कूल मिरज) संघावर ७ – ० गोलने एकतर्फी विजय मिळविला . कोल्हापूर जिल्हा संघाकडून पुनशिबा खोमद्राम २, शुभंकर भाटये २, याईफबसिंग थियाम, टोईनखोबा नॉगमैथेम, पार्थ खावरे यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले .
दुसऱ्या सामन्यात सातारा जिल्हा ( श्री शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल स्कूल फलटण ) संघाने सांगली जिल्हा (नवकृष्णा व्हॅली स्कूल, सांगली ) संघावर २-० गोलने मात केली . सातारा संघाकडून राजवीर निंबाळकर आर्यन दळवी यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली .
तिसऱ्या सामन्यात कोल्हापूर मनपा ( महाराष्ट्र हायस्कूल ) संघाने रत्नागिरी जिल्हा (एपि. एम. इ. मि. स्कुल, चिपळूण ) संघावर ४ -० गोलने एकतर्फी विजय संपादन केला . कोल्हापूर मनपाकडून श्लोक जाधवने वैयक्तीक तीन तर आर्यन पोवार एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला .
दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आणि संजीवन नॉलेज सिटी, पन्हाळा यांचे सहकार्याने विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला बु्धवार दि २२ जूलै २०२६ रोजी संजीवन नॉलेज सिटी पन्हाळा येथे प्रारंभ झाला . या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संजीवन नॉलेज सिटीचे सौरभ भोसले, क्रीडा विकास अधिकारी अजिंक्य चौगले, असोसिएशनचे सेक्रेटरी प्रदीप साळोखे व कोल्हापूर महानगरपालिका सचिन पांडव यांचे हस्ते करण्यात आले . यावेळी क्रीडा शिक्षक सागर पाटील, जयंत कुलकर्णी ,रघु पाटील, व्ही एस पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धाचे नियोजन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचे मार्गदर्शनखाली तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, सहा.क्रीडा विकास अधिकारी अजिंक्य चौगले, अमित साळोखे, जयंत कुलकर्णी, संदीप जाधव यांनी केले .

Our Visitor

5 4 8 4 7 8
Views Last 30 days : 81
Total views : 548752

You may also like

error: Content is protected !!