फोटो कॅप्शन – लहुजी संघर्ष सेनेच्या शिष्टमंडळातर्फे मंगळवारी नायब तहसिलदार नम्रता चौगुले यांना निवेदन देण्यात आले यावेळी अमर तडाखे, महेश चौगुले, निकेश गायकवाड आदी उपस्थित.
कोल्हापूर : (लोकमानस न्यूज : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती दि १ ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात यावी, अशी मागणी लहुजी संघर्ष सेनेच्या शिष्टमंडळातर्फे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. शिष्टमंडळाकडून देण्यात आलेले निवेदन नायब तहसिलदार नम्रता चौगुले यांनी स्वीकारले.

या निवेदनात म्हटले आहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती समाजकल्याण विभागाकडून विविध उपक्रम घेवून साजऱ्या केल्या जातात. त्याप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपकमांनी साजरी करण्यात यावी. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ हे मंडळ समाजकल्याण विभागांतर्गत येत असून येत्या १ ऑगस्ट २०२६ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती अनुसूचित जाती नवबौद्ध वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, जिल्हा व तालुकास्तरिय कार्यालये, शासकीय आयुक्त समाजकल्याण कार्यालय येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात यावी. तसेच यासंदर्भात शासनाकडून आद्यादेश काढण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या शिष्टमंडळात अमर तडाखे, महेश चौगुले, निकेश गायकवाड, प्रा. रोहित चौधरी, किरण मोरे, अजय कांबळे, सम्राट कवाळे, आयुष तडाखे आदींचा समावेश होता.
Our Visitor
Views Last 30 days : 83
Total views : 548754