कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक संचनालय व कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित विभागीय शालेय ज्यूदो स्पर्धेत सई, मनस्वी, कस्तुरी, क्रिश यांनी पदकांची कमाई करत यश संपादन केले. या चार खेळाडूंची अकोला आणि वासिम मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शालेय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यशस्वी खेळाडू न्यू ज्यूदो प्रशिक्षण केंद्राचे असून त्यांनी विभागीय शालेय ज्यूदो स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. यामध्ये महाराष्ट्र हायस्कूलच्या सई मुळीकने १४ वर्षाखालील ३२ किलो वजन गटात सुवर्णपदक, स. म. लोहिया हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या मनस्वी यादवने ४४ किलो वजन गटात सुवर्णपदक, विद्यापीठ हायस्कूल जूनियर कॉलेज कस्तुरी रानमाळे १९ वर्षाखालील ६३ किलो वजन गटात सुवर्णपदक, महावीर ज्युनिअर कॉलेज क्रिश मुकुंदन सतरा वर्षाखालील ८१ किलो वजन गटात सुवर्णपदक आदींचा समावेश आहे. त्यांच्या या खेळाच्या कामगिरीची दखल घेउन यशस्वी खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

तसेच या स्पर्धेत विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रज्वल यादवने सतरा वर्षाखालील ४५ किलो वजन गटात रौप्यपदक, स. म. लोहिया हाय. ज्युनि. कॉलेज आयुष अपराधने एकोणीस वर्षाखालील ६६ किलो वजन गटात रौप्यपदक पटकवून यश संपादन केले. यशस्वी खेळाडूंना लालासो गायकवाड यांचे प्रोत्साहन तर प्रशिक्षक शरद पोवार, आकाश चिले यांचे मार्गदर्शन लाभले.
लोकमानस न्यूज व्यवस्थापकीय संपादक स्वरूप तेली.
न्यूज व जाहिरातीसाठी संपर्क – 97 67 38 40 91. / 98 60 28 22 89.
Our Visitor
Views Last 30 days : 67
Total views : 549012