कोल्हापूर. : ( लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली ).
अमर रहे.. अमर रहे.. डॉ डी वाय दादा अमर रहे… च्या घोषणा देत शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ डी वाय पाटील दादा यांना बुधवारी अंत्ययात्रा काढून साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज, भगवा चौक ते पॅव्हेलियन मैदान अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कसबा बावड्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



कसबा बावडा येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अंत्ययात्रेसाठी डॉ डी वाय पाटील यांचे पार्थिव डी वाय पाटील मेडिकल कॉलेज येथे आणण्यात आले . यानंतर बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास लाईन बाजार, कसबा बावड्यातील डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेजपासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली . पुढे भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मुख्य मार्गावरुन पॅव्हेलियन मैदानावर अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आली . बुधवारी सकाळपासून दिवसभर निवास्थानासह, अंत्ययात्रा मार्ग व अंत्यविधी परिसर नागरिकांच्या गर्दीने फुलला होता . अंत्ययात्रा निघण्यापूर्वी मुख्य मार्गावरील गल्लीच्या प्रत्येक कोपऱ्याला नागरिकांची गर्दी झाली होती. अंत्ययात्रेच्या मुख्य मार्गासह प्रमुख चौकांमध्ये पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच या मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावरही बॅरेकेट्स लावून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बावड्यातील मुख्य मार्गाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरुन होणारी वाहतुक इतर मार्गाने वळविण्यात आली होती. अंत्ययात्रेपुर्वी मुख्य मार्गावर वाहतुक नसल्याने शुकशुकाट पसरला होता. तसेच पॅव्हेलियन मैदानाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्याला नागरिकानी गर्दी करुन उभा राहिले होते. अंत्ययात्रा जशी पुढे येईल तशी गर्दी करुन उभे राहिलेले नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते . तसेच पाटील गल्लीसह इतर गल्लीतील नागरिकांनी अभिवादन करुन पुष्पवृष्टी केली. अंत्ययात्रेसाठी जनसागर लोटला होता. पार्थिव ठेवण्यात आलेली गाडी फुलांनी मढविण्यात आली होती.
दरम्यान, शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. बावडा येथील निवासस्थानी बुधवारी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते . सकाळी नउ वाजल्या पासून या ठिकाणी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांनी रांगेतून त्यांचे अंतिम दर्शन घेउन अभिवादन करुन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Our Visitor
Views Last 30 days : 75
Total views : 548916