अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभारा

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना - शेंडा पार्कमधील बैठकीत घेतला कामांच्या प्रगतीचा आढावा

– शेंडा पार्कमधील बैठकीत घेतला कामांच्या प्रगतीचा आढावा

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी – नंदकुमार तेली).

होमिओपॅथी, आयुर्वेदिक, योगा या महाविद्यालयांसह व ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभारा अशी सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. सुरू असलेली सर्व बांधकामे विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.


यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी मौजे सांगाव येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय तसेच कागल येथील ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभाराव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तसेच पाणी, वीज, रस्ते आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत विशेष सतर्कता बाळगून आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिरजकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हजारे, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे बांधकाम सल्लागार तायवाडे-पाटील, होमिओपॅथी महाविद्यालयातील एअरबॉन्ड लिमिटेडचे शेळके आदी अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीमध्ये आयोजित आढावा बैठकीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाची प्रगती, मौजे सांगाव ता. कागल येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाच्या बांधकामासाठी पर्यावरणीय नाहरकत दाखल्याची उपलब्धी, उत्तूरच्या शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
==========

Our Visitor

5 4 8 4 7 8
Views Last 30 days : 83
Total views : 548754

You may also like

error: Content is protected !!