कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
मनपास्तर शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुले गटात स म लोहिया हायस्कुलने जीवन कल्याण माध्यमिक विद्यालयावर तर १९ वर्षाखालील मुले गटात विवेकानंद ज्युनिअर कॉलेजने वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल व जुनिअर कॉलेजवर मात करुन अजिंक्यपद पटकविले. तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र हायस्कूलने पटकविले विजेतेपद.
महाराष्ट्र हायस्कुल मैदान येथे कोल्हापूर मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांचे मार्गदर्शनुसार मनपास्तर शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा सुरु आहेत. स्पर्धेचे आयोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, संदीप पाटील यांनी केले.

स्पर्धांचा सविस्तर अंतिम व उपांत्य सामन्यांचा निकाल पुढीलप्रमाणे , १७ वर्षाखालील अंतिम सामन्यात सौ स म लोहिया हायस्कुलने जीवन कल्याण माध्यमिक विद्यालयावर १५-६, १५-९ गुणांनी मात करुन विजेतेपद पटकविले. विजयी सौ स म लोहिया हायस्कुल संघ : समर्थ दीक्षित, साईराज टोके, सर्वेश घाटगे, समर्थ कुंभार, संस्कार पाटील, वल्लभ शेवडे, पृथ्वीराज मुगडे, पृथ्वीराज पाटील, देवराज हिलगे, गौरव कांबळे , अथर्व बारटक्के, सोहम लंबे, क्रीडा शिक्षक आर एच गावीत व आर डी कुलकर्णी. तत्पूर्वी, झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात जिवन कल्याण माध्यमिक विद्यालयने भारती विद्यापीठ इंग्लिश स्कूलवर १५-११, १५-११ गुणांनी विजय संपादन केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सौ स म लोहिया हायस्कुलने विद्यापीठ हायस्कूल वर १५-११, १५-८ गुणांनी मात केली विजयी संघांनी अंतिम फेरीत धडक मारली.

१९ वर्षाखालील अंतिम सामन्यात विवेकानंद ज्युनिअर कॉलेजने श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल व जुनिअर कॉलेजवर १५-११, १५- ६ गुणांनी मात करुन अजिंक्यपद पटकविले. विजयी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज संघ : अनुज पुजारी, आयुष्य सांगलीकर , अद्विक पटेल, हर्षद सुतार, वाहिद मुल्ला, लकी यादव, मयुरेश काशीद, ध्रुव पटेल, अभिषेक सोनुले, अथर्व आळवणी, क्रीडा शिक्षक प्रा संतोष कुंडले, प्रा. साद मुजावर. तत्पूर्वी, झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूलवर महावीर जुनिअर कॉलेजवर १५ – १४, १५ – ८ गुणांनी मात केली. तर दुसऱ्या सामन्यात विवेकानंद ज्युनिअर कॉलेजने स म लोहिया हायस्कूलवर १५ ६, १५ १२ गुणांनी विजय संपादन केला.

*कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित सेवा संकल्प अभियान अंतर्गत मनपास्तर शासकीय शालेय हॉलीबॉल स्पर्धा* 17 वर्ष मुली
सेमी 1. महाराष्ट्र हायस्कुल विजय विरुद्ध जिवनकल्याण माध्यमिक विद्यालय 15-1, 15-4
सेमी 2. श्री गुरुदेव विद्यानिकेतन विजयविरुद्ध राधाबाई शिंदे इंग्लिश ग्लोबल स्कूल 15-12, 14-15, 15-13
अंतिम सामना : महाराष्ट्र हायस्कूल विजयविरुद्ध श्री गुरुदेव विद्यानिकेतन 15-3, 15-0.
विजयी संघ : स्वरांजली पाटील, लावण्या निकम, स्वराली पोवार, श्रावणी जाधव, काव्याजली पाटील, वैदेही पाटील, आराध्या लिगाडे, स्वराली शिंदे, जान्हवी नवाळे , नारायणी यादव, रुद्राक्षी शिंदे, सोहा मुल्ला, याना क्रीडा शिक्षक संदीप पाटील, अनिकेत बोडके, रोहन शिंदे, मधुरा पाटील.
लोकमानस न्यूज व्यवस्थापकीय संपादक स्वरूप तेली.
न्यूज व जाहिरातीसाठी संपर्क – 97 67 38 40 91. / 98 60 28 22 89.
Our Visitor
Views Last 30 days : 67
Total views : 549013