महाराष्ट्र हायस्कुल अजिंक्य

- सेंट झेविअर्स हायस्कूल संघावर ३-० गोलने पराभूत झाल्याने उपविजेता - शासकीय शालेय मनपास्तर फुटबॉल स्पर्धा १४ वर्षाखालील मुले गटातील स्पर्धा - सडनडेथवर रप्रायव्हेट हायस्कूल संघाने छत्रपती शाहू विद्यालय एसएससी संघावर मात करुन तृतीय क्रमांक पटकविला.

 

कोल्हापूर  : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी – नंदकुमार तेली).

पोलो ग्राउंड येथे कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित शासकीय शालेय मनपास्तर १४ वर्षाखालील मुले गटातील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कुल संघाने सेंट झेविअर्स हायस्कूल संघावर ३-० गोलने एकतर्फी विजय संपादन करून अजिंक्यपद पटकविले.
१४ वर्षाखालील मुले गटातील स्पर्धेचा सविस्तर निकाल :
अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल संघाने सेंट झेविअर्स हायस्कूल संघावर ३-० गोलने मात करुन विजेतेपद पटकविले . या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल संघाकडून विराज पोवारने वैयक्तीक दोन गोल तर वेदांत नलावडेने एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला .

विजयी महाराष्ट्र हायस्कूल संघातील खेळाडूंची नावे : रुद्रेन कोळी, गुरुप्रसाद पोतदार, श्रेयांश पोवार, वक्रतुंड पाटील, स्वराज जाधव, विराज मोरे, आराध्य माने, वेदांत नलवडे, वेदांत कदम, समर्थ पोवार, विराज पोवार, आर्यन लोंढे, विराज यादव, स्वरूप चव्हाण बंदरे, अद्वेत टेळके, अश्वेद भोसले, जियाद इनामदार, सोहम बनसोडे, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, व्ही एस पाटील, शरद मेढे, संतोष पवार, शुभम मुसळे .
स्पर्धेचे आयोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण आदींनी केले. तसेच संपूर्ण स्पर्धेतील विजेत्या संघांना सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर यांचेतर्फे प्रथम, द्वितीय, तृतीय ट्रॉफी देण्यात आली. विजेत्या संघांना बक्षीस वितरण सेंट झेविअर्स हायस्कुल प्रिंसिपल राजा साबरी मुत्तु, प्रदीप साळोखे, सचिन पांडव, सुरेश चव्हाण, अँलन फर्नांडिस, सतीश भोसले यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .
उपांत्य सामने, तृतीय क्रमांकाच्या सामन्यांचा सविस्तर निकाल
पहिल्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल संघाने छत्रपती शाहू विद्यालय एसएससी संघावर ५-० गोलने एकतर्फी मात केली यामध्ये महाराष्ट्रकडून विराज पवारने वैयक्तीक ३ गोल तर स्वराज जाधव, एकवेदांत नलवडे यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला .
दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघ विरुद्ध प्रायव्हेट हायस्कूल संघ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला . झेविअर्सने सडनडेथवर सामना जिंकला. दोन्हीही विजयी संघांनी अंतिम फेरीत धडक मारली तर पराभूत दोन्ही संघांमध्ये तृतीय क्रमांकासाठीचा सामना खेळविण्यात आला. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात प्रायव्हेट हायस्कूल संघ विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय एसएससी संघ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. यामध्ये प्रायव्हेट हायस्कुलने सडनडेथवर सामना जिंकला.
तत्पूर्वी, झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे, पहिल्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल संघाने शिलादेवी शिंदे सरकार हायस्कूल संघावर ३-० गोलने एकतर्फी मात केली. महाराष्ट्र संघाकडून वेदान नलवडे, विराज मोरे यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या दिवशी छत्रपती शाहू विद्यालय एसएससी संघाने आर्यव्रीन ख्रिश्चन हायस्कूल संघावर २-० गोलने विजय संपादन केला. यामध्ये शाहूकडून आरव घाडगेने वैयक्तीक दोन गोल गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला .
तिसऱ्या सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने डॉक्टर डी वाय पाटील विद्यानिकेतन साळोखेनगर संघावर ३ -० गोलने एकतर्फी मात केली. यामध्ये झेविअर्सकडून गौरव लुगडेने वैयक्तीक दोन गोल तर शिवेंद्र चव्हाणने एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. चौथ्या सामन्यात प्रायव्हेट हायस्कूल संघाने नागोजीराव पाटणकर हायस्कूल संघावर २-० गोलने विजय संपादन केला. यामध्ये प्रायव्हेटकडून श्लोक भोपळेने वैयक्तीक दोन गोल करुन संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

Our Visitor

5 4 8 5 9 4
Views Last 30 days : 65
Total views : 549013

You may also like

error: Content is protected !!