कोल्हापूर मनपा महाराष्ट्र हायस्कूल अजिंक्य

- सांगली मनपा (अप्पासाहेब बिरनाळे स्कुल) संघावर ३ - ० गोलने मात - १७ वर्षाखालील मुले विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा - राज्य फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र हायस्कूल पात्र

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

कोल्हापूर मनपा ( महाराष्ट्र हायस्कुल) संघाने सांगली मनपा (अप्पासाहेब बिरनाळे स्कुल) संघावर ३ – ० गोलने मात करुन स्पर्धेत अजिंक्यपद पटकिवले . यामध्ये कोल्हापूर मनपा संघाकडून सम्राट मोरबाळे, ऋतुराज वीर, राजवीर खराडे प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला . महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर काँलेज, कोल्हापूरच्या १७ वर्ष मुलांचा संघ राज्यस्तर फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागातून पात्र ठरला आहे .
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आणि संजीवन नॉलेज सिटी, पन्हाळा यांचे सहकार्याने १७ वर्षाखालील मुले गटातील विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामना कोल्हापूर मनपा ( महाराष्ट्र हायस्कुल) संघ विरुद्ध सांगली मनपा (अप्पासाहेब बिरनाळे स्कुल) संघ यांच्यात खेळविण्यात आला . या सामन्यात कोल्हापूर मनपा संघाने सांगली मनपा संघावर ३ – ० गोलने मात केली .


अंतिम विजयी कोल्हापूर मनपा संघ : अजय वडार, श्रीराम रजपूत, सार्थक विटेकर, वंश आगावणे, ऋतुराज वीर, सम्राट मोरबाळे, साईनाथ सुतार, केदार सोनाळे, साईराज पाटील, संचित उपलानी, संकेत जाधव, अर्णव शिंदे, श्लोक माळी, राजवीर खराडे, पृथ्वेश बागडेकर, श्रेयश धुमाळ,
क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे व्ही. एस. पाटील, शरद मेढे, सूर्यजित घोरपडे, सतीश भोसले, संतोष पोवार .


तत्पूर्वी, झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर मनपा संघाने सातारा जिल्हा (सैनिक स्कुल सातारा) संघावर ४ – ० गोलने एकतर्फी मात केली . यामध्ये कोल्हापूर मनपा संघाकडून सम्राट मोरबाळे, पृथ्वेश बागडीकर, ऋतुराज वीर, राजवीर खराडे यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला .
दुसऱ्या उपांत्य सामन्यात सांगली मनपा संघाने कोल्हापूर जिल्हा संघावर २ – १ गोलने मात केली . यामध्ये सांगलीकडून गौतम पाटील, वरद मडीहल्ली तर कोल्हापूर जिल्हा संघाकडून ऋषिकेश वाल्ले प्रत्येकी एक गोल केला .
तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात कोल्हापूर जिल्हा संघाने सातारा जिल्हा संघावर ३ १ गोलने मात केली . कोल्हापूर जिल्हा संघाकडून आदिराज जाधव २, देवराज पवार १ तर साताराकडून कुंदन कुमार १ गोल केला .
तत्पूर्वी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आणि संजीवन नॉलेज सिटी, पन्हाळा यांचे सहकार्याने सुरु असलेल्या १७ वर्षाखालील मुले गटातील विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी दि २३ जूलै २०२६ रोजी झालेल्या १७ वर्षाखालील मुले गटातील पहिल्या फेरीतील सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे, ,
पहिल्या सामन्यात कोल्हापूर मनपा ( महाराष्ट्र हायस्कुल) संघाने रत्नागिरी जिल्हा (सेंट थॉमस स्कुल रत्नागिरी) संघावर ३ – ० गोलने मात केली . कोल्हापूर मनपा संघाकडून सम्राट मोरबाळे, पृथ्वेश बागडीकर, अर्णव शिंदे यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला .


दुसऱ्या सामन्यात सांगली मनपा (अप्पासाहेब बिरनाळे स्कुल) संघाने सांगली जिल्हा (झिल इंटरनॅशनल स्कुल) संघावर २ – ० गोलने विजय मिळविला . सांगली मनपा संघाकडून सिद्धेश पाटील, शौर्य शंकरवाला यांनी प्रत्येकी एक गोल केला .
तिसऱ्या सामन्यात कोल्हापूर जिल्हा (संजीवन विद्यानिकेतन पन्हाळा) संघाने सिंधुदुर्ग जिल्हा ( सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली ) संघावर ६-० गोलने एकतर्फी मात केली . यामध्ये कोल्हापुर जिल्हा संघाकडून ऋषिकेश वाल्ले २, स्वराज सरनाईक २, धीरज कुरबेट्टी १, अविराज जाधव १ गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला .

Our Visitor

5 4 8 4 7 8
Views Last 30 days : 82
Total views : 548753

You may also like

error: Content is protected !!