कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
वैविध्यपूर्ण, प्राचीन, लक्षवेधी गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापनेमुळे मंगळवार पेठ परिसरातील या मंडळांचा नावलौकिक आहे या मंडळांमध्ये जय पद्मावती मंडळ, कलकल ग्रुप, गडगडाट ग्रुप वारे वसाहत बॉईज स्व संतोष गायकवाड प्रेमी आदींचा समावेश आहे या मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणेश मूर्ती नेहमीच गणेशाेत्सव काळात लक्षवेधी ठरतात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशमूर्तींची डिजिटल फलकावर सविस्तर माहिती प्रसिध्द करण्यात आलेली असते यामुळे गणेश भक्तांना गणेश मूर्ती कोणत्या काळातील, कोणत्या रुपातील तसेच मूर्ती संदर्भातील वैशिष्ठ्ये माहिती होण्यास मदत मिळते या गणेश मूर्ती पाहण्यासाठी व दर्शनासाठी शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातून नागरिकांची नेहमीच विक्रमी गर्दी होत असते. या मंडळांचा वैविद्यपूर्ण गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्याबद्दल अनेक पुरस्कारांनी गौराविण्यात आले आहे.


कॅलिफोर्निया येथील ‘बाली शैलीत’ कोरलेली गणेश मूर्ती : जय पद्मावती मंडळ
जय पद्मावती मंडळातर्फे प्रतिष्ठापना करण्यात आलेली गणेश मुर्ती ही कॅलिफोर्निया येथील बाली शैलीत कोरलेल्या रुपातील आहे. गणेशाची ही मुर्ती पुर्णपणे ‘बाली शैलीत’ कोरलेली आहे. मुळ मुर्तीची उंची २६ इंच व वजन ९ किलो असुन ती लाकडा पासुन तयार केलेली आहे.

पृथ्वीवर आगमन करताना श्रीगणेशाने सर्वप्रथम ज्या भूमीवर पाऊल ठेवले ती मानली जाते आंजर्ल्याची भूमी : कलकल ग्रुप
श्री गणरायाच्या आगमनाची अद्भुत संकल्पना पृथ्वीवर आगमन करताना श्रीगणेशाने सर्वप्रथम ज्या भूमीवर पाऊल ठेवले, आंजर्ल्याची भूमी मानली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात, अरबी समुद्राच्या सान्निध्यात आणि जोग नदीच्या मुखाजवळ वसलेले आंजर्ले हे कोकणातील निसर्गरम्य आणि ऐतिहासिक गाव . या गावाची ओळख केवळ समुद्र, नारळ-सुपारीच्या बागा किंवा कोकणच्या निसर्गामुळे नाही, तर येथील अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या श्री कड्यावरचा गणपती मंदिरामुळे विशेष आहे. या देवस्थानाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे गणपतीचे पहिले पाऊल म्हणून श्रद्धेने पूजली जाणारी शिळेवरील गणेशाची पाउलखूण . फोटो याच पवित्र स्थळाचा आहे. स्थानिक श्रद्धेनुसार, पृथ्वीवर आगमन करताना श्रीगणेशाने सर्वप्रथम ज्या भूमीवर पाऊल ठेवले, ती आंजर्ल्याची भूमी मानली जाते. या श्रद्धेमुळे या पाऊलखुणेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
———————-





योगेश्वर शक्तीश्वर शीर्षासनातील शिवस्वरूप एक उलथापालथ शिवलिंग. : कलकल ग्रुपने साकारली भव्य प्रतिकृती
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम जवळ यनामथुरु येथील अरुल्मिगुनाम शक्तिश्वर मंदिरात भगवान शिव उलथापालथ करत आहेत आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात भीमावरम जवळील यमनदुररु या गावात भगवान शिवाचे एक अत्यंत प्राचीन आणि वैशिष्ट्यपू्र्ण देवस्थान आहे या मंदिराचे नाव श्री शक्तीश्वर स्वामी मंदिर किंवा श्री पार्वतीसमेत शक्तीश्वर स्वामी मंदिर असे प्रचलित आहे या मूर्तीमध्ये भगवान शिव शीर्वासिनासारख्या अवस्थेत आहेत. त्यांचे डोके पृथ्वीच्या दिशेने असून पाय वरच्या वरच्या दिशेने आहेत. शिवांची जय खाली आलेली दिसते. त्यांच्या शरीराची संपूर्ण रचना त्या उलट्या योगस्थितीशी सुसंगतपणे करण्यात आलेली आहे शिवांच्या शेजारी पार्वती देवी बसलेल्या आहेत. त्यांच्या मांडीवर बाल सुब्रह्मण्य म्हणजेच कार्तिकेय किंवा कुमार स्वामी आहेत. त्यामुळे या मूर्तीमध्ये शिवाचे योगरूप, पार्वतीचे शक्ती आणि मातृत्वाचे रूप आणि कुमाराचे बालरूप एकत्र दिसते. शिवाला येथे शक्तीश्वर असे संबोधले जाते. शक्ती म्हणजे पार्वती आणि ईश्वर म्हणजे शिव. शिव आणि शक्ती यांच्या एकत्रित स्वरूपामुळे हे नाव प्राप्त झाले, अशी स्थानिक धार्मिक परंपरा आहे. शिव म्हणजे योग आणि चेतना, पार्वती म्हणजे शक्ती, आणि कुमार म्हणजे त्या देवी शक्तीचे बालरूप शिवाच्या शिल्परूपात नागाभरणाला पारंपरिक शैव परंपरेत महत्व आहे. नागाचा संबंध काल, मृत्यू, कुंडलिनी, संरक्षण आणि भयावर विजय अशा विविध प्रतीकांशी जोडला जातो.
———————–



नरमुखी श्री आदि विनायक रुपातील गणेश मूर्ती : गडगडाट ग्रुप वार वसाहत बाईज स्व. संतोष गायकवाड प्रेमी
नरमुखी श्री आदि विनायक ॥ एक रूप अद्वितीय एक श्रद्धा अलौकिक, तिलतर्पणपुरी, तामिळनाडू येथील अद्वितीय गणेश स्वरूप येथे भगवान गणेशाचे मानवी मुख असलेले दुर्मिळ स्वरूप विराजमान आहे. त्यांना आदि विनायक नरमुख, विनायक नरमुख पिल्लैयार म्हणून ओळखले जाते. विनायक (किंवा आदी विनायक) है हिंदू देवता भगवान गणेशाचे एक अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण रूप आहे. या रूपात गणपतीला हत्तीचे मुख (सोंड) नसन मानवी चेहरा आहे. शिवजींनी गणेशाचे मस्तक घडावेगळे करण्यापून बाल गणेशाचे जे मूळ रूप होते, तेच हे ‘आदि विनायक’ रूप मानले जाते. या रुपाला ‘नर-मुख विनायक’ असेही म्हटले जाते.
जगातील एकमेव मंदिर तामिळनाडु राज्यातील तिरूवरूर जवळील तिकतर्पणपुरी (कूथनूर) येथे स्थित आहे. या मंदिराला आदि विनायक मंदिर म्हणून ओळखले जाते. मूर्ती साधारण ५ फूट उंच असून ती नाइट दगडापासून बनलेली आहे. मुद्रा गणपती उजवा पाय खाली सोडून ध्यानस्थ बसलेले आहेत. आयुधेः त्यांना चार हात असून हातांमध्ये कु हाड, पाश (दोर), कमळ आणि मोदक आहेत. त्यांच्या अंगावर सापांचे अलंकार आहेत. पौराणिक इतिहास आणि श्रीरामांशी संबंधया मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडला जातो. पितृतर्षण : जेव्हा प्रभू रामचंद्र त्यांचे पिता राजा दशरथ यांच्या निधनानंतर पितृतर्पण (पिंडदान) करत होते, तेव्हा त्यांनी ठेवलेले पिंडाचे गोळे वारंवार कीटकांचे रूप घेत होते. भगवान शिवांचा सल्ला यावर उपाय म्हणून भगवान शिवानी श्रीरामांना या ठिकाणी (तिळतर्पणपुरी) जाऊन आदि विनायकाची पूजा करण्याचा सल्ला दिला. पिंडाचे शिवलिंगात रूपांतरः श्रीरामांनी येथे पूजा करून जेव्हा तांदळाचे चार गोळे (पिंड) ठेवले, तेव्हा त्यांचे रूपांतर चार शिवलिंगांमध्ये झाले. हे शिवलिंग आज शेजारीच असलेल्या मुकेश्वर महादेव मंदिरात पाहायला मिळतात. धार्मिक महत्तया मंदिराला पितृदोष मुक्तीसाठी अतिशय पवित्र मानले जाते.
———————
Our Visitor
Views Last 30 days : 65
Total views : 549013