रोटरी तर्फे मंगळवारी रास दांडिया : २.५० लाखाची बक्षीसे

रोटरीचे प्रेसिडेंट रो. प्रदीप पासमल आणि इव्हेंटचे अध्यक्ष रो आमिष शहा यांची माहिती

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

रोटरी तर्फे मंगळवारी रास दांडिया : २.५० लाखाची बक्षीसे

रिव्हर साईड होंडा शोरूम समोर, रामकृष्ण लान्स, जुना टोल नाक्याजवळ कोल्हापूर येथे मैया इस्टेट बेंगलोर प्रस्तुत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आयोजित रास दांडिया २०२६ मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ पासून  रास दांडियाचे आयोजन केले आहे.

यामध्ये विविध भागासाठी दोन लाख पन्नास हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत,  अशी माहिती रोटरीचे प्रेसिडेंट रो. प्रदीप पासमल आणि इव्हेंटचे अध्यक्ष रो आमिष शहा यांनी पत्रकार बैठकीत दिली. प्रसिद्ध निवेदिका ऐश्वर्या यांच्या सूत्रसंचालनासह प्रसिद्ध तारका मिलोनी झोनसा या रसिकांचे मनोरंजन करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

सौंस्कृतीक वारसा जोपसण्यासह अशी सेवा उपक्रमे

या नवरात्रीचे औचित्य साधून सामाजिक एकता आणि सौंस्कृतीक वारसा जोपसण्यासह अशी सेवा उपक्रमे राबवत आहे.
तसेच खाद्यपदार्थ स्टाल्स, मनोरंजनाचाही समावेश आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य प्रयोजक पीएनजी ज्वेलर्स, बिग मिश्रा, राजाकाका, व्हीटीसी कॉर्पोरेशन, विराज जंकशन, युरो, किचन प्लस, फूड पार्टनर रेस्टो, हॉस्पिटॅलिटी पार्टनर द ग्रँड लेगसी, मेक माय ट्रिप व सहप्रायोजक एबीसी अचीव ब्राइट करियर, नीलकंठ मार्बल अँड ग्रेनाईट, भवानी आयरनकेम टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, महालक्ष्मी ग्लास, सोळंकी इन्वेस्टमेंट आदी आहेत.


या पत्रकार परिषदेवेळी क्लबचे सेक्रेटरी हर्षद ढाळे, दांडिया इव्हेंट चे उपाध्यक्ष रो लक्ष्मीनिवास बियाणी, शरद तोतला, धवल गाला, अरविंद क्रीशनन, सिद्धार्थ पाटणकर, जयेश गांधी, पारस वसा, प्रीतेश कर्णवट, निलेश कुत्ते, साहिल गांधी, अमोल घोडके, अभिषेक झवर उपस्थित होते.


लोकमानस न्यूज व्यवस्थापकीय संपादक स्वरूप तेली.

न्यूज व जाहिरातीसाठी संपर्क – 97 67 38 40 91. / 98 60 28 22 89.

Our Visitor

5 4 8 5 9 4
Views Last 30 days : 65
Total views : 549013

You may also like

error: Content is protected !!