राजारामपुरी आगमन मिरवणुक जल्लोषात

- नेत्रदिपक लाईट इफेक्ट व साउंड सिस्टीमच्या ठेक्यावर थिरकली तरुणाई - साउंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादेच्या नियमात पोलीस प्रशासनाकडून मंडळांना मुख्य आगमन मिरवणुकीत प्रवेश - पोलीस प्रशासनाच्या सिग्नल व्यवस्थेमुळे मिरवणुक सुरळीत नागरिकांना मिरवणुक पाहण्यासाठी येण्याचा व जाण्याचा मार्ग वेगवेगळा

 

कॅप्शन – राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीत लक्षवेधी ठरलेली एका मंडळाची आकर्षक सिंहासनारुढ गणेशमुर्ती.

कॅप्शन – घरगुती गणरायाचे जल्लोषात आगमन झाले महिलावर्ग, बालचमूंसह अबालवृध्दांनी गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात केले गणरायाचे स्वागत करुन प्रतिष्ठापना केली.

कॅप्शन – राजारामपुरी आगमन मिरवणुकीतील नेत्रदिपक लाईट ईफेक्ट व साउंड सिस्टीमच्या ठेक्यावर थिरकली तरुणाई.

कोल्हापूर : (लोकनामा न्यूज – विशेष प्रतिनिधींना नंदकुमार तेली).
राजारामपुरी परिसरातील मंडळांची आगमन मिरवणुक जल्लाेषात काढण्यात आली. नेत्रदिपक लाईट ईफेक्ट व साउंड सिस्टीमच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली. ही राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुक पाहण्यासाठी शहर, उपनगरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आगमन मिरवणुका रात्री उशीरापर्यंत सुरु राहिल्या. यामुळे राजारामपुरीतील गल्ल्यांचा परिसर झोकाळून निघाला होता.

राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत साउंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादेच्या नियमांची कोटेकोर अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली होती. या आवाजाची मर्यादा तपासून मुख्य आगमन मिरवणुकीत मंडळांना प्रवेश देण्यात आला. मिरवणुक सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनातर्फे प्रथमच सिग्नल व्यवस्था करण्यात आली होती. रेड सिग्नल लागल्यावर थांबणे व २० मिनिटांच्या अंतराने ग्रीन सिग्नल लागल्यावर मिरवणुक पुढे जाण्यास निघत होती. यामुळे प्रमुख मंडळांची मिरवणुक एकाच ठिकाणी जास्तवेळ न रेंगाळत राहता पुढे सरकत राहिली. पोलीस प्रशासनाने आगमन मिरवणुकीसाठी प्रथमच केलेल्या सिग्नल व्यवस्थेचे तालीम मंडळांचे, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
आवाजाची मर्यादा तपासूनच मिरवणुकीत मंडळांना परवानगी
राजारामपुरी परिसरातील विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी शहर, उपनगरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची गर्दी होत असते. या आगमन मिरवणुकीत साउंड सिस्टीम, लाईट इफेक्ट आदींसह गणेश मुर्तीसाठी ट्रेलवर करण्यात आलेली आकर्षक लक्षवेधी सजावट हे आकर्षण असते. यंदाच्या गणेशोत्सवात शासनाने साउंड सिस्टीमच्या आवाजाच्या मर्यादेत मिरवणुक काढण्यास परवानगी दिली होती. तसेच आवाजाची मर्यादा सांभाळून पारंपरिक पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. याउलट परिस्थिती राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीवेळी पोलीसांच्या निदर्शनास आली. यानंतर पोलीसांनी आवाजाची मर्यादा तपासूनच आगमन मिरवणुकीत जाण्याची परवानगी देण्यास सुरुवात केली. यावेळी मंडळांचे पदाधीकारी, कार्यकर्त्यांनी आठमुठी भूमिका घेत पोलीसांबरोबर हुज्जत घातली. मात्र, यावर नियंत्रण मिळवत पोलीसांनी आवाजाची मर्यादा तपासूनच आगमन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मंडळांना परवानगी दिली.
गणेश आगमन मिरवणुकीसाठी प्रथमच सिग्नल व्यवस्था
राजारामपुरीतील जनता बझार चौक ते आग्नेयमुखी मारुती मंदिर मुख्य मार्गावरून निघणाऱ्या मिरवणुकीत राजारामपुरी परिसरातील प्रमुख ५३ सार्वजनिक मंडळांनी सहभाग घेतला होता. आगमन मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. तसेच मुख्य चौकासह आगमन मिरवणुक मार्गावर नियंत्रण कक्षाचे मंडपही उभारण्यात आले होते. मुख्य मार्गाला जोडणाऱ्या इतर गल्लीतील पाच ठिकाणी ‘सिग्नल’ रस्त्यांवरून थेट प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.
२० मिनिटांची वेळ संपताच लाल सिग्नलला थांबावे तर हिरवा सिग्नलला पुढे जाणेची सूचना
आगमन मिरवणुकीतील मंडळांची मिरवणुक विना अडथळा सुरळीत व्हावी, यासाठी राजारामपुरी परिसरातील प्रत्येक मंडळांना एकाच ठिकाणी २० मिनिटे थांबता येतील, असे नियोजन करण्यात आले होते. २० मिनिटांची वेळ संपताच सिग्नल दिल्यानंतर लाल सिग्नलवेळी थांबावे, तर हिरवा सिग्नल देताच पुढे जावे, अशी व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती.
राजारामपुरी आगमन मिरवणुकीसाठी उभारण्यात आले होते नियंत्रण कक्ष
राजारामपुरी आगमन मिरवणुकीसाठी मुख्य चौकासह मिरवणूक मार्गावर नियंत्रण कक्ष उभारले होते. मुख्य मिरवणुकीत जाणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. माऊली पुतळ्याकडून ताराराणी विद्यापीठकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक शाहमिल चौकीकडून सुरू ठेवण्यात आली होती. वाहतूक मार्गात बदल राजारामपुरी मुख्य मार्गावरून गणेशमूर्ती घेऊन चौकीकडून वरील दिशेने जाणारी वाहने ताराराणी विद्यापीठ, माऊली पुतळा या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. बागल चौकातून पुढे जाणाऱ्यांनी बी. टी. कॉलेजमार्गे पुढे शहाजी लॉ कॉलेजकडून राजारामपुरी वाहतूक टाकाळा चौक अशी सुरु ठेवण्यात आली होती.
जिल्हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
गणेशोत्सवाच्या सुरुवातीला असणाऱ्या आगमन मिरवणुकीचा उत्सव शांततेत पार पडावा. यासाठी जिल्हा पोलिस दलाची यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. यामध्ये १४० अधिकारी, १५२३ पोलिस अंमलदार, जलदकृती दलाच्या दोन तुकड्या, पंधराशे होमगार्ड, असा कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच शहरातील शाहूपुरी, बापट कॅम्प, गंगावेशसह प्रमुख कुंभार गल्ल्यांच्या ठिकाणी वाहतुक मार्गात बदल, पार्किंग व्यवस्थेचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले होते. तसेच शहरातील आगमन मिरवणुकीसाठी पोलिस उपअधीक्षक, पाच पोलिस निरीक्षक, तेवीस उपनिरीक्षक, बारा पोलिस अंमलदार, दोन जलदकृती दल, शंभर होमगार्डची तुकडी तैनात करण्यात आला होता. गणेश आगमन मिरवणुकीत मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले होते.

सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना
विद्येची देवता गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, शहरासह उपनगरातील प्रमुख मंडळांच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. आगमन मिरवणुकीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करण्यात आला होता. ट्रॉलीमध्ये आकर्षक फुलांची सजावट, लाईट इफेक्ट, प्रभावळ आदींने सजविण्यात आले होते. तसेच पारंपरिक वाद्यांसह आवाजाच्या मर्यादेत साउंड सिस्टीमच्या ठेक्यात पारंपरिक वेशभूषा करुन सहभागी कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह आगमन मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये महिलावर्गाचा लक्षणिय सहभाग होता. जिल्ह्यात सुमारे आठ हजार पाचशे सार्वजनिक मंडळांमध्ये, तर सुमारे पाच लाख ९२ हजार घरगुती गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Our Visitor

5 4 8 5 9 4
Views Last 30 days : 65
Total views : 549013

You may also like

error: Content is protected !!