कॅप्शन – मनपास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत १५ वर्षाखालील मुले गटातील अंतिम सामन्यातील विजेता महाराष्ट्र हायस्कूलच्या संघातील खेळाडूंसमवेत प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक आदी उपस्थित.
कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी – नंदकुमार तेली).
छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित मनपा स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या १५ वर्षाखालील मुले गटातील अंतिम सामना महाराष्ट्र हायस्कूल विरुध्द छत्रपती शाहू विद्यालय एसएससी यांच्यात खेळविण्यात आला. या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालय एसएससीवर ३ – ० गोलने एकतर्फी मात करुन अजिंक्यपद पटकविले .
अंतिम सामन्यात महाराष्ट्रकडून वेदांत नलवडेने वैयक्तीक दाने गोल तर अभिजीत आडुळकर एक गोल करुन संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

अंतिम विजयी महाराष्ट्र हायस्कूल संघ : सोहम चिले, आराध्य चौगुले, आर्यन पवार, कौस्तुभ सोनाळे, रणवीर पाटील, केदार भोसले, प्रज्वल कवडे, वेदांत नलावडे, श्लोक जाधव, अभिजीत आडुळकर, अथर्व चव्हाण, समर्थ पवार, वेधवर्धन सुतार, वेदांत चव्हाण, अनुज बंदरे, पार्थ बुचडे, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, वी. एस. पाटील शरद मेढे, शुभम मुसळे, संतोष पोवार .
दरम्यान, स्पर्धेतील सर्व विजयी, उपविजेत्या, तृतीय क्रमांकाच्या संघास राष्ट्रीय शालेय फुटबॉल खेळाडू कै. अवधूत राजेंद्र घारगे यांचे स्मरणार्थ अवधूत घारगे फाउंडेशन यांचे वतीने आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. बक्षीस वितरण कोल्हापूर महानगरपालिका क्रीडा समिती सभापती व नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, उपासभापती व नगरसेवक रोहित कवाळे, सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, महाराष्ट्र हायस्कुल प्राचार्य एस ए जाधव, कोल्हापूर सॉकर रेफ्रि असोसिएशन सेक्रेटरी प्रदीप साळोखे, क्रीडा शिक्षक सुरेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
गुरुवारी दिवसभर १५ वर्षाखालील मुले गट, १७ वर्षाखालील मुले, मुली गटातील खेळविण्यात आलेल्या सामन्यांचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे,
१५ वर्षाखालील मुले गट –
पहिल्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने कोल्हापूर पब्लिक स्कूलवर ४ – ० गोलने एकतर्फी मात केली. यामध्ये महाराष्ट्रकडून केदार भोसले, प्रज्वल कवडे, वेदान नलवडे, श्लोक जाधव यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय एसएससीने पोदार स्कुलवर २ – १ गोलने विजय संपादन केला. यामध्ये शाहूकडून श्रीजीत माळी, अर्जुन देवकर यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तर पोतदार स्कूलकडून सूर्यांश पाटील याने एकमेव गोल केला.
तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात पोदार स्कूलने कोल्हापूर पब्लिक स्कूलवर १ – ० गोलने मात केली. पोदार स्कूलकडून ॲशली डायसने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
१७ वर्षाखालील मुली गट –
पहिल्या सामन्यात सेंट झेविअर्स हायस्कुलने छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसईवर १ – ० विजय मिळविला . यामध्ये झेविअर्सकडून ज्ञानेश्वरी खोतने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसऱ्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय एसएससीने भाई माधवराव बागल हायस्कूलवर १ – ० गोलने मात केली. यामध्ये शाहूकडून मिताली भोईटेने एकमेव गोल नोंदविला.
१७ वर्षाखालील मुले गट –
पहिल्या सामन्यात विद्यापीठ हायस्कूलने प्रायव्हेट हायस्कूलवर १ ० गोलने विजय मिळविला . यामध्ये विद्यापीठकडून विभव निकमने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
दुसऱ्या सामन्यात कोल्हापूर पब्लिक स्कूल विरुध्द साई इंग्लिश मीडियम स्कूल जरगनगर यांच्यातील सामना पूर्णवेळ गोलशून्य बरोबरीत राहिला. यामध्ये कोल्हापूर पब्लिक स्कूलने टायब्रेकरमध्ये ३ – २ गोलने विजय मिळविला . तिसऱ्या सामन्यात महावीर इंग्लिश स्कूलने न्यू इंग्लिश मीडियम स्कूल संभाजीनगरवर १ – ० गोलने मात केली. यामध्ये महावीरकडून वीरवर्धन पाटीलने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
Our Visitor
Views Last 30 days : 83
Total views : 548754