सडनडेथवर वेताळमाळची पीटीएमवर मात

- महापौर चषक फुटबॉल स्पर्धा : वेताळमाळ अंतिम फेरीत दाखल - लढवय्या खेळाडू ठरला पीटीएमचा प्रतिक बदामे - आज दुसरा उपांत्य सामना : दु ४ वाजता शिवाजी मंडळ विरुध्द दिलबहार

कॅप्शन – दोन पेठांमधील प्रमुख तुल्यबळ संघ वेताळमाळ विरुध्द पीटीएम यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यातील एक क्षण. (छाया – नाज अत्तार ).

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

दोन पेठांमधील प्रमुख संघ पाटाकडील तालीम मंडळ विरुध्द वेताळमाळ यांच्यातील सामना अपेक्षेप्रमाणे अखेरच्या मिनिटापर्यंत रंगतदार झाला. पूर्णवेळ सामना गोलशून्य राहिल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय पंचांनी घेतला. टायब्रेकरमध्येही सामना ४-४ गोल बरोबरीत राहिल्याने सडनडेथचा अवलंब करण्यात आला. सडनडेथमध्ये चौथ्या पेनल्टीपर्यंत सामना बरोबरीत राहिला. तर पाचव्या पेनल्टीत वेताळमाळचा गोल झाला तर पीटीएमचा गोल झाला नाही. यामुळे सडनडेथवर वेताळमाळ तालीम मंडळने तुल्यबळ पाटाकडील तालीम मंडळ अ संघावर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.


छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु असलेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी दुपारी चार वाजता वेताळमाळ विरुध्द पीटीएम यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळविण्यात आला. दोन्हीही संघातील खेळाडूंनी विविध चाली रचत वेगवान खेळ करुन प्रतिस्पर्धी संघांवर गोल करण्याचे प्रयत्न केले. पीटीएमकडून रोमारिओ, अमीर काजीर, ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर, ऋषीकेश मेथे पाटील, रोहित मंडलिक यांनी तर वेताळमाळकडून आकाश माळी, योकीम, संदेश कासार, ऋतुराज सु्र्यवंशी, शोएब बागवान यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करुन प्रतिस्पर्धी संघांवर गोल करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दोन्हीही संघातील खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरल्याने पूर्णवेळ सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरमध्येही बरोबरी राहिल्याने सडनडेथचा अवलंब करण्यात आला. सडनडेथवर वेताळमाळने पीटीएमवर मात करुन अंतिम फेरीत धडक मारली.
चौकटी –
– असे झाले टायब्रेकरवर गोल…
पीटीएम अ गोल वेताळमाळ गोल
प्रथमेश हेरेकर १ शोएब बागवान १
अरबाज पेंढारी १ जय कामत १
रोहित पोवार १ प्रणव कणसे १
प्रतिक बदामे १ रेहान मुजावर १
अमीर खजीर ० योकीम ०
एकुण ४ एकुण ४

– असे झाले सडनडेथवर गोल….
पीटीएम अ गोल वेताळमाळ गोल
ऋषीकेश मेथे पाटील ० सर्वेश वाडकर ०
यशराज कांबळे १ विशाल कुरणे १
रोमारिओ १ आकाश मोरे १
महंमद शाहीर पटेल १ मणिकंद मोर्गन १
ओंकार मोरे ० ऋतुराज सुर्यवंशी १
एकुण ३ एकुण ४
सडनडेथवर वेताळमाळची पीटीएमवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

Our Visitor

5 4 8 4 3 0
Views Last 30 days : 367
Total views : 548648

You may also like

error: Content is protected !!