लिंगायत समाजासाठी ‘अमृत संस्थेच्या योजनांचा मार्ग मौकळा

समस्त लिंगायत समाज राज्याध्यक्ष संजय तेलनाडे यांची माहिती : अमृत संस्थेच्या लक्षित गटात समावेशाचा राज्य शासनाचा निर्णय

कोल्हापूर :  (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेच्या लक्षित गटामध्ये हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजाचा समावेश करणारा शासन आदेश इतर मागास बहुजन कल्याण विभागाने गुरुवारी जारी केला आहे.
या आदेशानुसार हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास नागरिक व विद्यार्थ्यांना ‘अमृत’ संस्थेच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. विशेषतः शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि स्वयंरोजगारासाठीच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे., अशी माहिती समस्त लिंगायत समाज राज्याध्यक्ष संजय तेलनाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संजय तेलनाडे म्हणाले, हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील जे नागरिक किंवा विद्यार्थी इतर मागासवर्गीय (ओबीसी) अथवा अन्य कोणत्याही राखीव प्रवर्गाचा किंवा स्वतंत्र महामंडळाच्या योजनांचा लाभ घेत नाहीत, त्यांना ‘अमृत’च्या योजनांचा लाभ घेता येईल. त्यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे तसेच शासनाने निश्चित केलेले आर्थिक निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे. दरम्यान, या समाजघटकातील विद्यार्थ्यांचा ‘अमृत’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रशिक्षण योजनांमध्य े समावेश करण्याचे निर्देश संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनानुसार लिंगायत समाजातील आर्थिक मागास नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी आणि दारे खुली केली आहेत, या संधीचा लिंगायत बांधवांनी अधिकाधिक लाभ घ्यावा.

शिवाजीराव पाटील, आमदार

शैक्षणिक फायदे

आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस, आयआयआयटी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा १०,००० पर्यंत, युपीएससी मुख्य परीक्षा / मुलाखत तयारीसाठी ५०,००० पर्यंत, एमपीएससी व गट अ/ब परीक्षा १५,००० पर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. टायपिंग व लघुलेखनासाठीही आर्थिक सहाय्य मिळणार असून ड्रोन उड्डाण, नियंत्रण, सर्व्हेक्षण, छायाचित्रण याच े मोफत प्रशिक्षण विद्यार्थी व संशोधकांना सुविधा व मार्गदर्शन मिळेल.

कौशल्य विकास प्रशिक्षण

रोजगारक्षम कौशल्ये, संगणक, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक प्रशिक्षण. ‘बेकरी’, ‘संगणक’, ‘व्यक्तिमत्त्व विकास’ यांसारखे विनामूल्य प्रशिक्षण मिळेल. नवीन उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणार आहे. व्यवसायासाठी १५ लाखांपर्यंत कर्ज घेतल्यास त्याचे व्याज अमृत फेडणार आहे. कृषी उत्पन्न आधारित उद्योग प्रशिक्षण, कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योगासाठी प्रशिक्षण, कर्ज व बाजारपेठेची संधी.
समस्त लिंगायत समाज महाराष्ट्र राज्य सर्व लिंगायत बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व विशेष आभार चंदगड विधानसभा मतदारसंघाचे शिवाजीराव पाटील यांचे मान्यता आले. महाराष्ट्र लिंगायत समाज सर्व युवक यांच्या वतीने हार्दिक आभार मानले आहेत.

पत्रकार परिषदेस समस्त लिंगायत समाजचे सरकार प्रशांत शहापुरे जिल्हा परिषद सदस्य. मनोज कुमार रणदिवे, राजशेखर तंबाके, एडवोकेट सुरेश पाटील. शंकर बिराजदार, अभिजीत नाइकवाडे, स्वप्निल चौगुले, संतोष पाटील, प्रमोद भेंडवडे, दत्तात्रय खडके, रमेश मिठारे, विनोद कागले, लिंगायत पदाधिकारी,  कार्यकर्ते उपस्थित होते.

Our Visitor

5 4 8 5 4 3
Views Last 30 days : 75
Total views : 548916

You may also like

error: Content is protected !!