कॅप्शन : – १ घनकचरा व्यवस्थापन कायदा कार्यशाळेमध्ये बोलताना पर्यावरण अभ्यासक प्रा डॉ. रसिया पडळकर .
कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
एक एप्रिल 2026 घनकचरा व्यवस्थापन कायदा अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली आहे. मात्र, दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा ग्राम पातळीवर जनजागृती करण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करून प्रबोधन करण्यावर भर द्यावा., असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक प्रा डॉ. रसिया पडळकर यांनी केले.

अवनि संस्था किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवारी आयोजित १ एप्रिल २०२६ सुधारित घनकचरा व्यवस्थापन कायदा कार्यशाळेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण चार प्रकारात कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखविले. ही कार्यशाळा शहरालगतच्या ग्रामपंचायतीच्या अभ्यासासाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्हा परिषद कोल्हापूर पाणी व स्वच्छता प्रकल्प संचालक माधुरी परीट अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना माधुरी परीट म्हणाल्या , गाव पातळीवर किंवा शहरांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी सुविधा खूप कमी पातळीवर आहेत.. यासाठी गाव पातळीवरच कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे गरजेचे आहे. एक एप्रिल २०२६ च्या कायद्यानुसार दंडात्मक तरतुदीसोबत युजर चार्जेस घेणे बंधनकारक आहे. घरगुती कचरा गोळा करत असताना यूजर चार्जेस घेणे शक्य नसले तरी व्यावसायिक पातळीवरील जो कचरा आहे त्याचे चार्जेस घेतले पाहिजेत . असे त्या म्हणाल्या. यावेळी अवनि संस्था कचरा वेचक भगिनी सोबत कचरा वर्गीकरणाचे काम उत्तम पद्धतीने करत असल्याची स्तुती त्यांनी केली .
अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेने कचरा वर्गीकरणाची जबाबदारी पूर्ण करत असताना भूमिका कडक केली पाहिजे, असे सांगितले . कचरा ही संपत्ती आहे, त्याचे वर्गीकरण गावात होत असताना घरोघरी देखील ओल्या कचऱ्याचे खत तयार करता येईल . यावर त्यांनी भर दिला पाहिजे . पुढे त्या म्हणाल्या आपला कचरा ही आपली जबाबदारी आहे. कचरा वेचक भगिनींना मिक्स कचऱ्यामुळे वर्गीकरण करताना अडचण येते. त्यामुळे प्रत्येकाने वर्गीकरणाची सवय लावून घ्यावी हाच अवनिचा उद्देश असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले .
किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे शरद अजगेकर यांनी कचरा वर्गीकरण करत असताना अनंत अडचणी येतात . मात्र, याची सवय घरातील प्रत्येक व्यक्तीला लागली . तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. यासाठी घरातील प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी.

कॅप्शन : – २ घनकचरा व्यवस्थापन कायदा कार्यशाळेवेळी उपस्थित जनसमुदाय .
या कार्यशाळेस पंचायत समिती सदस्य,वडणगे ग्रामपंचायत, निगवे दुमाला,पाचगाव, सरनोबतवाडी, वसगडे, आंबेवाडी गडमुडशिंगी, नागदेववाडी, वाशी, बालिंगा, वाडी पीर, पाडळी खुर्द, कळंबा आदी ग्रामपंचायत यांनी सहभाग नोंदवला. कचरा वेचक सहकारी संस्था अध्यक्षा भारती कोळी आणि वसुंधरा कचरावेचक संघटना अध्यक्ष अक्काताई गोसावी यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यशाळेत ग्रामपंचायत अधिकारी आणि सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना रसिया पडळकर आणि अनुराधा भोसले यांनी समाधानकारक उत्तर दिले. यावेळी अवनी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वनिता कांबळे तर आभार पूजा लोहार यांनी मानले.
Our Visitor
Views Last 30 days : 75
Total views : 548916