कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोल्हापूर महानगरपालिका आयोजित शालेय मनपास्तर हँडबॉल स्पर्धेत मंगळवारी महाराष्ट्र हायस्कुल मैदानावर झालेल्या १४ वर्षाखालील मुले गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने व. ज. देशमुख इंग्लिश मीडियम वर ७-१ गोलने तर १७ वर्षाखालील मुले गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने व.ज.देशमुख हायस्कूलवर १६-२ गाेलने मात करुन विजेतेपद मिळवुन दुहेरी मुकुट पटकविला.

१४ वर्षाखालील मुले गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने व. ज. देशमुख इंग्लिश मीडियमवर ७-१ गोलने मात करुन अजिंक्यपद पटकविले.

१४ वर्षाखालील विजयी महाराष्ट्र हायस्कूल संघातील खेळाडूंची नावे : आरव रानमाळे, गोरक्ष कचोटे, सादिक नदाफ, श्रीपद्म गवळी, शिवम यादव, शिवतेज पाटील, वेदांत गवळी, राजवीर कुराडे, रणवीर राणे, दीपराज आंबी, गणेश शेळके, करण पाटील, ओम पिसे, ऋषिकेश डोंबले, आर्यन जाधव, शशांक सुतार, क्रीडा शिक्षक संदीप पाटील मार्गदर्शक अभिजित राणे,शुभम इंग्लंजकर, सुशांत साळवी.
दरम्यान, तत्पूर्वी झालेल्या तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात दत्ता बाळ इंग्लिश मीडियमने राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियमवर ३-० गोलने विजय संपादन केला. तसेच १४ वर्ष मुले गटातील उपांत्य सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे, पहिल्या उपांत्य सामन्यात राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल विरुध्द व. ज.देशमुख यांच्यात झाला. या सामन्यात व .ज. देशमुख स्कूलने ५-० गोलने मात केली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने दत्ता बाळ इंग्लिश स्कूलवर १५-१ गोलने विजय संपादन केला. दोन्ही विजयी संघांनी अंतिम फेरीत धडक मारली.

१७ वर्षाखालील मुले गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने व.ज.देशमुख हायस्कूलवर १६-२ गोलने एकतर्फी विजय संपादन करून विजेतेपद पटकविले. विजयी संघ महाराष्ट्र हायस्कूल संघातील खेळाडूंची नावे : करण कोइगडे, सर्वेश खाडे, शिवराज पाटील, शौर्य जाधव, ऋषभ पाटील, मयंक माळी, अथर्व यादव, आर्य बाळेकाई, श्रवण दिंडे, वेदांत पाटील, रुद्रताई तायशेटे, मोहम्मद उस्मान इनामदार, प्रथमेश ठाकूर, प्रताप कोदले, दक्ष घाडी, अभिनव पाटील, क्रीडा शिक्षक संदीप पाटील मार्गदर्शक अभिजित राणे,शुभम इंग्लंजकर, सुशांत साळवी.
दरम्यान, १७ वर्षाखालील मुले गटातील तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात दत्ता बाळ इंग्लिश स्कूलने राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियमवर २- ० गोलने विजय संपादन केला. तसेच १७ वर्षाखालील मुले गटातील उपांत्य सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे, पहिल्या उपांत्य सामन्यात व.ज. देशमुख इंग्लिश स्कूलने राधाबाई शिंदे इंग्लिश स्कूलवर ६-४ गोलने मात केली तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने दत्ता बाळ इंग्लिश स्कूलवर ११-१ गोलने विजय संपादन केला.
या स्पर्धेचे उद्घाटन श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे सचिव एस. जे.मेटील, महाराष्ट्र हायस्कूल चे मुख्याध्यापक एस ए. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक क्रीडाशिक्षक संदीप पाटील यांनी केले.
Our Visitor
Views Last 30 days : 74
Total views : 548915