कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे बुधवारी डॉक्टर्स डे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शासन निर्णयानुसार वसंतराव नाईक यांची जयंतीही साजरी करण्यात आली.
भेटवस्तू देऊन डॉक्टरांचा सत्कार
प्रथम महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस भिसे यांनी कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर आदित्य बिर्ला ग्रुप यांच्याकडून डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांना भेटवस्तू देऊन डॉक्टरांचा सत्कार केला.
डायलिसिस विभागास वेइंग मशीन (वजन काटा) देणगी स्वरूपात
ईनरव्हील क्लब ऑफ सनराईज, कोल्हापूर यांच्यावतीने डॉक्टर्स डे निमित्त सीपीआर मधील डायलिसिस विभागास वेइंग मशीन (वजन काटा) देणगी स्वरूपात देण्यात आला. यावेळी ईनरव्हील क्लब ऑफ सनराईज, कोल्हापूरच्या अध्यक्षा सौ. वृषाली बाड, सचिव सौ.पूनम सरनाईक, खजानिस सारिका पाटील, इ सी मेंबर शिल्पा अष्टेकर, शमीना शेख, नंदिनी पाटील, नीता मगदूम, एडिटर अपर्णा पाटील उपस्थित होत्या.

डॉक्टरांना राष्ट्रमाता जिजाऊ यांचे चरित्र भेट
यानंतर डॉक्टर्स डे चे औचित्य साधून मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड महिला संघटना, कोल्हापूर यांच्या वतीने डॉक्टरांच्या कार्याप्रती आणि सेवाभावप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच उपस्थित सर्व डॉक्टरांना राष्ट्रमाता जिजाऊ यांचे चरित्र भेट देण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेड महिला संघटनेच्या विभागीय कार्याध्यक्षा चारुशीला पाटील, जिल्हा अध्यक्षा वनिता निंबाळकर, कार्याध्यक्षा सौ.स्मिता कोकाटे, जिल्हा उपाध्यक्षा स्मिता हतकर, जिल्हा प्रवक्त्या अश्विनी पाटील, संघटक सर्वदा हरणे, राधानगरी तालुक्याच्या अध्यक्षा राजश्री किरुळकर या उपस्थित होत्या.
सदर सर्व कार्यक्रमाचे नियोजन समाजसेवा अधीक्षक विभागाच्या वतीने करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र मदने, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.गिरीश कांबळे, बोलरोगशास्त्र विभागाचे डॉ.भूषण मिरजे, औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. अनिता परितेकर, उरो व क्षयरोगशास्त्र डॉ.अनिता सैबन्ननावर, अस्थिव्यंगशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.राहुल बडे, शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.वसंत देशमुख, बालरोगशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.संगीता कुंभोजकर, क्षकिरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक विभागप्रमुख डॉ.देसाई, बधीरीकरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. उल्हास मिसाळ, क्षकिरणशास्त्र विभागाचे डॉ. स्वेनिल शहा, प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप, तसेच महाविद्यालय आणि रुग्णालयाकडील सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, समाजसेवा अधीक्षक विभागाचे नोडल अधिकारी शशिकांत राऊळ, बाजीराव आपटे, महेंद्र चव्हाण, अजित भास्कर, सुनीता जाधव त्याचबरोबर महाविद्यालय आणि रुग्णालयाकडील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Our Visitor
Views Last 30 days : 83
Total views : 548754