(सर्व छाया : नंदकुमार तेली).
कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी प्रमुख रस्त्याच्या दुतर्फा असलेली मंडळे, उमा टॉकीज चौक परिसरातील मंडळांनी वैविध्यपूर्ण, विविध रुपातील लक्षवेधी गणेश मूर्तींची प्रतिष्ठाना केली आहे. यामध्ये लक्ष्मीपुरी मित्र मंडळ प्रणित फायटर्स ग्रुप, देश प्रेमी कट्टा ग्रुप, लक्ष्मीपुरी, न्यू यंगस्टार फ्रेंडस् सर्कल, डाव ग्रुप, उमा चौक तालीम मंडळ, सुभाष रोडचा राजा विश्वशांती तरुण मंडळ, रविवार पेठ, पुलगल्ली तालीम मंडळाची भु अधिपती गजानन रुपातील गणेश मूर्ती, सर्वोदय मित्र मंडळाची वृंदावनातील बाप्पा रुपातील गणेश मूर्ती व तांत्रिक देखावा, दिलबहार तालीम मंडळाची जोतिबा मंदिराची व जोतिबाची भव्य साकारण्यात आलेली प्रतिकृती, दख्खनचा राजाच्या रुपातील आकर्षक लक्षवेधी गणेश मूर्ती व राजाचा दरबार आदींचा समावेश आहे.

वैविद्यपूर्ण, विविध रुपातील लक्षवेधी गणेश मूर्तींच्या दर्शनासाठी लोटला जनसागर
या मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणेश मूर्तीची माहिती देणारे डिजिटल फलक उभारले आहेत. तसेच डिजिटल फलकाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनासह इतर प्रबोधनात्मक संदेशाव्दारे जनजागृती केली जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या वैविध्यपू्र्ण, विविध रुपातील लक्षवेधी गणेश मूर्ती पाहण्यासह दर्शनासाठी जनसागर लोटला आहे. दसरा चौक सिग्नल ते उमा टॉकीज चौक परिसरात विविध रुपातील लक्षवेधी गणेश मूर्ती पाहण्यासाठी अबालवृध्दांनी एकच गर्दी केली. यामुळे या परिसरातील प्रमुख रस्त्यांसह चौकांमध्ये कोंडमारा होत आहे. देखावे, गणेश मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी दुचाकी व चारचाकीमधून आपल्या कुटुंबीयांसह फेरफटका मारत असल्याने ही कोंडीतून मार्ग काढत नागरिकांना खडतर प्रवास करावा लागत आहे.





रात्री उशिरापर्यंत रस्ते, चौक राहिले गजबजलेले
या लक्षवेधी गणेश मूर्ती यंदाच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरत आहेत. यामुळे या परिसरातील गणेश मूर्ती पाहण्यासाठी दिवसेंदिवस नागरिकांची गर्दी वाढत आहे. दुचाकी व चारचाकीमुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. यासाठी वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस, होमगार्ड तसेच मंडळांचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे वाहतुक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी रात्री उशीरापर्यंत या लक्षवेधी गणेश मूर्ती पाहण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी सुरु राहिल्याने या परिसरातील रस्ते, चौक गजबजलेले होते.
Our Visitor
Views Last 30 days : 65
Total views : 549013