कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
कोल्हापूर जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय आयाेजित विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १७ व १९ वर्षाखालील मुले गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने प्रतिस्पर्धी संघांवर मात करुन विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट पटकविला. तर १४ वर्षाखालील मुलींच्या गटात कोल्हापूर जिल्हा (संजीवन विद्यालय पन्हाळा)ने प्रतिस्पर्धी संघावर मात करुन अजिंक्यपद पटकविले.

१७ वर्षाखालील मुले गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल )ने कोल्हापूर जिल्हा ( संजीवनी विद्यालय पन्हाळा)संघावर १-० गाेलने मात करुन अजिंक्यपद पटकविले. या सामन्यात कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर) कडून ऋतुराज वीरने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात महत्वपू्र्ण योगदान दिले. विजयी महाराष्ट्र हायस्कूल संघातील खेळाडू : श्लोक माळी, अजय वडर,सार्थक विटेकर, संकेत जाधव वंश आगावणे, केदार सोनाळे, सम्राट मोरबाळे,संचित उपलानी, प्रथमेश बागडेकर, अर्णव शिंदे, ऋतुराज वीर, श्रेयस धुमाळ, साईराज पाटील, साईराज देसाई, वरद पोवार,श्रीराम राजपूत,प्रतीक इंगवले, निशांत जाधव .

१९ वर्षाखालील मुले गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज )ने सातारा जिल्हा (मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण ) संघावर ३-० गोलने मात करुन विजेतेपद पटकविले. या सामन्यात कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज कोल्हापूर ) कडून शुभम कांबळे, मंथन देसाई, मयूर सुतार यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विजयी महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज संघातील खेळाडू : ईशान हिरेमठ,प्रतीक पाटील,पृथ्वीराज पाटील, प्रणव यादव, प्रथमेश बडगुजर, पृथ्वीराज साळोखे, स्वरूप सुतार, शुभम कांबळे, सर्वेश गवळी, मंथन देसाई, कार्तिक निकम, विवेक पाटील, ब्रायन चक्को, शौर्य गवळी, सुरेश सावंत, स्वरूप बागडेकर, तन्मय घोरपडे, मयूर सुतार. वरील दोन्ही संघांचे क्रीडा शिक्षक,प्रशिक्षक प्रदीप साळुंखे श्री व्ही एस पाटील, संतोष पोवार, शरद मेढे, सूर्यजीत घोरपडे .

१४ वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्हा (संजीवन विद्यालय पन्हाळा)ने सातारा जिल्हा (श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल फलटण सीबीएसई) संघावर १-० गोलने मात करुन अजिंक्यपद पटकविले. या सामन्यात कोल्हापूर जिल्हा (संजीवन विद्यालय पन्हाळा) कडून नारायणी कणसेने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विजयी कोल्हापूर जिल्हा (संजीवन विद्यालय पन्हाळा) संघातील खेळाडू : आणया सरगर, स्नेहा अकोइजम, श्रावणी जाधव आराध्या जाधोर, लंचनवी लोरेबम, रितिका जाधव,श्वेता मोरे, नारायणी कणसे, मलंग बी यांग दे, गायत्री वाघवकर,ईश्वरी गव्हाणे,स्वरांजली महाडिक,आराध्या सरगर, क्रीडा शिक्षक सागर पाटील,अमित साळोखे.
—————————————————-तत्पूर्वी, झालेल्या सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे,
17 वर्षे आतिल मुले
1) कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर) विजयविरुद्ध सांगली मनपा (एबीपी एस स्कूल सांगली )3–0.
कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर) कडून संकेत जाधव, संचित उपलांनी, ऋतुराज वीर प्रत्येकी एक गोल.
2) सिंधुदुर्ग जिल्हा( सैनिक स्कूल आंबोली ) विजयविरुद्ध सांगली जिल्हा ( सेथॉम स्कूल अंकली )4–0.
सिंधुदुर्ग जिल्हा( सैनिक स्कूल आंबोली ) कडून दुर्वेश कोटनाळे दोन गोल, ओम गोसावी, आर्यन वारेकर प्रत्येकी एक गोल.
3) रत्नागिरी जिल्हा (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी) विजयी विरुद्ध सातारा जिल्हा ( श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल फलटण )0-0.
ट्राय ब्रेकर वर रत्नागिरी जिल्हा (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी) 3/1 गोलने विजयी.
4) कोल्हापूर जिल्हा( संजीवनी विद्यालय पन्हाळा) विजयविरुद्ध इचलकरंजी शहर( इचलकरंजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,इचलकरंजी)1-0.
कोल्हापूर जिल्हा (संजीवनी विद्यालय पन्हाळा) कडून वेदांत माळी एक गोल.
उपांत्य सामने :–
1)कोल्हापूर जिल्हा( संजीवनी विद्यालय पन्हाळा) विजयविरुद्ध रत्नागिरी जिल्हा (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी) 2–0.
कोल्हापूर जिल्हा (संजीवनी विद्यालय पन्हाळा) कडून शुभंकर भाटे 2 गोल.
2)कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर) विजयविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा( सैनिक स्कूल आंबोली ) 4–0.
कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर) कडून सम्राट मोरबाळे दोन गोल, अर्णव शिंदे पृथ्वेश बागडीकर प्रत्येकी एक गोल.
तृतीय क्रमांकाचा सामना :–
रत्नागिरी जिल्हा (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी) विजयविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा( सैनिक स्कूल आंबोली )
रत्नागिरी जिल्हा (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी) करून अफाक मेमन एक गोल.
19 वर्षा आतील मुले
1) कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज कोल्हापूर )विजयविरुद्ध इचलकरंजी शहर (तात्यासाहेब मुसळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी )4–0.
कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज कोल्हापूर ) कडून प्रथमेश बडगुजर दोन गोल मंथन देसाई, सर्वेश गवळी प्रत्येकी एक गोल
2) सिंधुदुर्ग जिल्हा ( सैनिक स्कूल आंबोली )विजयी विरुद्ध रत्नागिरी जिल्हा ( अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी)2-0.
सिंधुदुर्ग जिल्हा ( सैनिक स्कूल आंबोली ) कडून महादेव देऊळकर ऑस्टिन बीटो प्रत्येकी 1 गोल.
3) सातारा जिल्हा (मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण )विजयी विरुद्ध सांगली मनपा (बापूजी साळुंखे कॉलेज मिरज) 2–1
सातारा जिल्हा संघाकडून तेजस ढेकळे सोहम घोडके प्रत्येकी एक गोल कडून शिवांग महाडिक एक गोल,सांगली मनपा ( बापूजी साळुंखे कॉलेज मिरज ) कडून ओंकार साळे एक गोल.
4) कोल्हापूर जिल्हा( सायरस पूनावाला इंग्लिश स्कूल पेठ वडगाव ) विजयी विरुद्ध सांगली जिल्हा ( झील स्कूल बामनोली )1–0
कोल्हापूर जिल्हा( सायरस पूनावाला इंग्लिश स्कूल पेठ वडगाव ) कडून शिवांग महाडिक एक गोल,
उपांत्य सामने:-
1)कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज कोल्हापूर )विजयविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा ( सैनिक स्कूल आंबोली ) 2–0.
कोल्हापूर मनपा (महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज कोल्हापूर ) कडून कार्तिक निकम दोन गोल.
2)सातारा जिल्हा (मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण )विजयी विरुद्ध कोल्हापूर जिल्हा( सायरस पूनावाला इंग्लिश स्कूल पेठ वडगाव ) 1-0
सातारा जिल्हा संघाकडून तेजस ढेकळे एक गोल
तृतीय क्रमांकाचा सामना :–
कोल्हापूर जिल्हा( सायरस पूनावाला इंग्लिश स्कूल पेठ वडगाव ) विजयविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा ( सैनिक स्कूल आंबोली )1–0.
कोल्हापूर जिल्हा( सायरस पूनावाला इंग्लिश स्कूल पेठ वडगाव ) कडून सोहम तपासे एक गोल.
14 वर्षा आतील मुली
1) सातारा जिल्हा (श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल फलटण सीबीएस ई)विजयविरुद्ध रत्नागिरी जिल्हा( कै.सौ.मीनाताई ठाकरे हायस्कूल साडवली रत्नागिरी )3-0.
सातारा जिल्हा (श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल फलटण सीबीएस ई) कडून श्रद्धा जमदाडे दोन गोल आराध्या निंबाळकर एक गोल.
2) कोल्हापूर जिल्हा (संजीवन विद्यालय पन्हाळा) विजयविरुद्ध सांगली जिल्हा (नव कृष्णा व्हॅली सांगली )3–0.
कोल्हापूर जिल्हा (संजीवन विद्यालय पन्हाळा) कडून आणया सरगर दोन गोल, नारायणी कणसे एक गोल.
उपांत्य सामने :–
1)सातारा जिल्हा (श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल फलटण सीबीएस ई)विजयविरुद्ध कोल्हापूर मनपा( छत्रपती शाहू विद्यालय )1-0
सातारा जिल्हा (श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल फलटण सीबीएस ई) कडून आराध्या निंबाळकर एक गोल.
2)कोल्हापूर जिल्हा (संजीवन विद्यालय पन्हाळा) विजयविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा (श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव सिंधुदुर्ग) 3–0.
कोल्हापूर जिल्हा (संजीवन विद्यालय पन्हाळा) कडून आणया सरगर दोन गोल, नारायणी कणसे एक गोल.
तृतीय क्रमांकाचा सामना :-
कोल्हापूर मनपा( छत्रपती शाहू विद्यालय ) विजयविरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा (श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव सिंधुदुर्ग) 2–0.
कोल्हापूर मनपा( छत्रपती शाहू विद्यालय ) कडून नीरजा जांभळे दोन गोल.
लोकमानस न्यूज व्यवस्थापकीय संपादक स्वरूप तेली.
न्यूज व जाहिरातीसाठी संपर्क – 97 67 38 40 91. / 98 60 28 22 89.
Our Visitor
Views Last 30 days : 67
Total views : 549012