केएसए डिव्हीजन ए खेळाडूंची डिजी लॉकर्ससह नोंदणी सुरु

- कोल्हापूर स्पार्टस असोसिएशनची माहिती - सोळा संघांअंतर्गत खेळाडू व जिल्ह्याबाहेरील तीन खेळाडूंची करता येणार नोंदणी - सीआरएस नोंदणीकृत खेळाडूंना डिजी लॉकर्स व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

फुटबॉल हंगाम सन २०२६-२०२७ केएसए ए डिव्हीजन फुटबॉल संघांकरिता पात्र असणाऱ्या १६ संघांअंतर्गत खेळाडू व कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील तीन खेळाडू यांची डिजी लॉकर्ससह नोंदणी सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनतर्फे प्रसिध्दी पत्रकाव्दारे देण्यात आली आहे.
या पत्रकात म्हटले आहे, सन २०२६-२०२७ या फुटबॉल हंगामासाठी केएसए ए डिव्हीजन अंतर्गत पात्र असणाऱ्या १६ संघांना खालीलप्रमाणे दिलेल्या काही अटीनुसार २० खेळाडूंची नोंदणी करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

सी.आर.एस नोंदणीकृत खेळाडूंना डिजी लॉकर्स व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक

खेळाडू नोंदणी प्रथम ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सेंट्रलाईज्ड रजिस्ट्रेशन सिस्टीममध्ये, आपल्या संघात नोंदणी होणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक व जिल्ह्याबाहेरील अॅमॅच्युअर खेळाडूंची नोंदणी दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजीपर्यंत करावी. मात्र, प्रोफेशनल खेळाडूंची नोंदणी दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजीपर्यंत करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत खेळाडूंची रजिस्ट्रेशन व्हॅलिडिटीची मान्यता सन २०२६-२०२७ साठी चालू असणे आवश्यक आहे. एआयएफएफने सी.आर.एस नोंदणीकृत खेळाडूंना डिजी लॉकर्स व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक केलेले आहे. (सोबत एआयएफएफचे मँडेटरी डिजी लॉकर परिपत्रक पाठविले आहे.)

कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील तीन (३) खेळाडू नोंदणी

सन २०२६-२०२७ या फुटबॉल हंगामासाठी कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील भारत देशातील जन्म असणारे तीन (३) खेळाडूंची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येईल. कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील खेळाडू म्हणून नोंदणी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंने वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई यांच्यामार्फत एआयएफएफच्या सीआरएस अंतर्गत के.एस.ए. च्या नोंदणीकृत संघासाठी ट्रान्सफर झालेबाबतचे ट्रान्सफर सर्टिफिकेट व योग्य ती सर्व कागदपत्रे नोंदणी कालावधीत दिल्यानंतरच संघामध्ये त्याची नोंदणी करता येईल.

क) लोन बेसेस अंतर्गत खेळाडू नोंदणीबाबत

लोन बेसेस अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील खेळाडू म्हणून नोंदणी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंने वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई यांच्यामार्फत एआयएफएफच्या सी.आर.एस. अंतर्गत के.एस.ए.च्या नोंदणीकृत संघासाठी लोन ट्रान्सफर झालेबाबतचे ट्रान्सफर सर्टिफिकेट व योग्य ती सर्व कागदपत्रे नोंदणी कालावधीत दिल्यानंतरच त्याची नोंदणी केली जाईल. सदरच्या खेळाडूला मान्यता दिलेल्या कालावधीसाठीच संबंधीत संघातून खेळता येईल.
‘ए’ डिव्हीजन करिता ऑनलाईन खेळाडू नोंदणी
के.एस.ए.’ए’ डिव्हीजन पात्र १६ संघ यांनी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सेंट्रलाईज्ड रजिस्ट्रेशन सिस्टीममध्ये दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजीपर्यंत स्थानिक १७/२० खेळाडू यांची संपूर्णपणे वरीलप्रमाणे दिलेल्या अटींनुसार (अ, ब, क) मान्यताप्राप्त नोंदणी करावी. व त्यांच्याच नांवांची एआयएफएफ सीआरएस प्लेअर डिटेल्स लीस्ट प्रमाणीत करून संघाने के. एस.ए. मध्ये दि.०१ ऑक्टोबर, २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत रितसर देणे आवश्यक आहे. संघाने दिलेल्या प्रमाणीत खेळाडूंच्या यादीनुसार के.एस.ए. ‘ए’ डिव्हीजन करिता ऑनलाईन पद्धतीने संघ व खेळाडू यांची नोंदणी के.एस.ए.कडे करता येणार आहे. तसेच आपल्या संघात नोंदणी होणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील ३ (तीन) खेळाडूंना एआयएफएफ सीआरएस अंतर्गत अंतिम मान्यता (अप्रुव्हड) मिळालेली असेल त्याच खेळाडूंची नोंदणी ही नंतर म्हणजेच के.एस.ए. ‘ए’ डिव्हीजन करिता ऑनलाईन खेळाडू नोंदणी कालावधीत संघामध्ये नोंदणी करणेसाठी परवानगी देणेत आलेली आहे.
केएसएच्या अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
सन २०२५-२०२६ मध्ये के.एस.ए. ‘ए, बी, सी व गडहिंग्लज’ डिव्हीजनमध्ये नोंदणीकृत असणारे एआयएफएफ सीआरएस खेळाडू चालू वर्षी नोंदणी करण्यासाठी संघांना के.एस.ए.च्या अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळावर (www.ksakolhapur.org) माहितीसाठी उपलब्ध आहेत. विशेष नोंदः एआयएफएफ सीआरएस अंतर्गत अंतिम मान्यता अपूर्ण (पेंडींग) असणाऱ्या कोणत्या प्रकारच्या खेळाडूंची नोंदणी केएसएकडे होणार नाही. अधिकची माहिती के.एस.ए.च्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. तरी के. डिव्हीजनमधील सर्व संघांनी सदर विषयाची नोंद घेऊन संघ व खेळाडू यांच्या नोंदणीबाबतची वेळेत योग्य ती कार्यवाही करावी.

Our Visitor

5 4 8 5 4 5
Views Last 30 days : 77
Total views : 548918

You may also like

error: Content is protected !!