कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
पोलो ग्राउंड स्पर्धा मैदानावर सुरु असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित शासकीय शालेय मनपास्तर फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या १९ वर्षाखालील मुली गटातील अंतिम सामन्यात कमला कॉलेजने न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलवर ३-० गोलने एकतर्फी मात करुन विजेतेपद पटकविले तर १७ वर्षाखालील मुली गटातील अंतिम सामन्यात उषाराजे हायस्कूलने सेंट झेविअर्स हायस्कूलवर १-० गोलने विजय संपादन करून अजिंक्यपद पटकविले.

सोमवारी झालेल्या सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे,
१९ वर्षाखालील मुली गटातील अंतिम सामन्यात कमला ज्युनिअर कॉलेजने न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलवर ३-० गोलने एकतर्फी मात करुन विजेतेपद पटकविले कमला कॉलेजकडून वैष्णवी पोवार, संयोगिता शिंदे, श्रुती चौगले यांनी प्रत्येकी १ गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

विजेतेपद पटकविलेल्या कमला ज्युनिअर कॉलेज संघातील खेळाडू : युगंधरा चौगुले, संस्कृती तुरुके, वैष्णवी पवार, सही बोरनाक, दिक्षिता निवतकर, सायली देवणे, नताशा पवार, संयोगिता शिंदे, श्रुती चौगुले, श्रेया कोराणे, आरती पाटील, वैष्णवी जाधव, क्रीडा शिक्षक रघु पाटील, ज्योती गावडे, पूजा ठाकूर.
१७ वर्षाखालील मुली गटातील अंतिम सामन्यात उषाराजे हायस्कूलने सेंट झेविअर्स हायस्कूलवर १-० गोलने मात करुन अजिंक्यपद पटकविले. सामन्यात उषाराजे संघाने एकमेव गोलवर सामना जिंकला.

अजिंक्यपद पटकविलेला उषाराजे हायस्कूलच्या संघातील खेळाडू : जान्हवी पाटील, आर्या कांबळे, सई नलवडे, पायल जाधव, शर्वरी कोरे, प्रांजली गाडीवडर, आदिती पाटील, सृष्टी वांद्रे, श्रुती निपाणीकर, भूमी गाडगीळ, स्वरा पटेल, आराध्या माने, आदिती दिंडलकुपे. क्रीडा शिक्षक रघु पाटील.
तत्पूर्वी, झालेल्या तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसईने पोदार स्कूलवर विजय मिळवून तृतीय क्रमांक पटकविला. स्पर्धेचे बक्षिस वितरण महाराष्ट्र भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर, सेक्रेटरी सॉकर रेफ्रि असोसिएशन प्रदीप साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण, सिद्धार्थ कुराडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, १४ वर्षाखालील मुली गटातील सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे,
पहिल्या उपांत्य सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय एसएससी विरुद्ध सेंट झेविअर्स हायस्कुल यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरवर शाहू विद्यालय संघाने सेंट झेविअर्स हायस्कुलवर १-० गोलने मात करुन अंतिम फेरीत धडक मारली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात पोदार स्कूल विरुद्ध राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल यांच्यातील सामनाही गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरवर पोदार स्कुलने सामन्यात २-१ गोलने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
१४ वर्षाखालील मुली गटातील अंतिम सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय एसएससी संघ पोदार स्कूलशी विजेतेपदासाठी भिडणार आहे.
तत्पूर्वी, झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूलने न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलवर ३-० गोलने एकतर्फी मात केली. ग्लोबल स्कूलकडून सुहाना खान, अनुप्रिया पाटील, आराध्य शहापूरकर यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
Our Visitor
Views Last 30 days : 72
Total views : 548913