कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
पोलो मैदानावर सुरु असलेल्या १९ वर्षाखालील मुले गटातील शालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यांत महाराष्ट्र हायस्कुलने न्यू मॉडेल इंग्लिश जुनियर कॉलेजवर ५-० गोलने तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात स म लोहिया हायस्कुल कॉलेजने डी वाय पाटील कॉलेजवर २-० गोलने मात करुन अंतिम फेरीत धडक मारली.
पहिल्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र हायस्कुलने न्यू मॉडेल इंग्लिश जुनियर कॉलेजवर ५-० गोलने एकतर्फी मात केली. यामध्ये महाराष्ट्रकडून कार्तिक निकमने ३ तर मंथन देसाईने २ गोल करुन संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात स म लोहिया हायस्कुल कॉलेजने डी वाय पाटील कॉलेजवर २-० गोलने विजय संपादन केला. यामध्ये स म लोहियाकडून कुणाल गवंडी, हर्ष करनाळे यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

तत्पूर्वी झालेल्या १९ वर्षाखालील मुले गटातील शालेय फुटबॉल स्पर्धेतील आठ सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे,
पहिल्या सामन्यात न्यू कॉलेजने राजर्षी शाहू कॉलेज सदरबाजारवर ३-० गोलने मात केली. यामध्ये न्यू कॉलेजकडून अथर्व सावंतने दोन, कृष्णा गाडेने एक गोल करुन संघाच्या विजयात मोलचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात छत्रपती शाहू कॉलेज एसएससी जुनिअर कॉलेजने रा. छ. शाहू कॉलेज, जुना बुधवारवर ४-० गोलने एकतर्फी विजय संपादन केला. शाहू कॉलेजकडून कुणाल साठे, वीरेंद्र पवार यांनी प्रत्येकी दोन गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिसऱ्या सामन्यात डॉ. डी वाय पाटील कॉलेज ताराबाई पार्क विरुध्द विवेकानंद कॉलेज यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरवर डी वाय पाटील कॉलेजने ३-२ गोलने मात केली. चौथ्या सामन्यात डी डी शिंदे सरकार कॉलेजने मेन राजाराम जुनिअर कॉलेजवर १-० गोलने विजय संपादन केला. सामन्यात डी डी शिंदेकडून यश शिंदेने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
पाचव्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने न्यू कॉलेजवर ६-० गोलने एकतर्फी मात केली. यामध्ये महाराष्ट्रकडून स्वरूप बागडेकर ३, प्रथमेश बडगुजर, मंथन देसाई, कार्तिक निकम यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाची वाटा उचलला. सहाव्या सामन्यात न्यू मॉडेल इंग्लिश जुनियर कॉलेजने छत्रपती शाहू विद्यालय एसएससी जुनियर कॉलेजवर २-० गोलने मात केली. यामध्ये न्यू मॉडेलकडून सत्यम सावंत, तनिष्क दिगवडेकर यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सातव्या सामन्यात डी वाय पाटील ज्युनिअर कॉलेज ताराबाई पार्क विरुद्ध डीडी शिंदे सरकार कॉलेज यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरवर डी वाय पाटील कॉलेजने ४ – ३ गोलने मात केली. आठव्या सामन्यात स म लोहिया हायस्कूल कॉलेजने कॉमर्स कॉलेजवर १-० गोलने विजय मिळविला. यामध्ये स म कडून कुणाल गवंडीने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
Our Visitor
Views Last 30 days : 75
Total views : 548916