प्रशिक्षण व फेलोशिपच्या मर्यादित संधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता

- कोल्हापूर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस - एस पीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेपरफुटी विरोधात जोरदार निदर्शने - एमपीएससी व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
कोल्हापूर शहर (जिल्हा)
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस – एस पीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेपरफुटी विरोधात निदर्शने करण्यात आली. यानंतर एमपीएससी व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

– एमपीएससी व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

या निवेदनात म्हटले आहे, परीक्षा प्रक्रियेतील अनिश्चितता, रखडलेली पदभरती, वाढता आर्थिक भार तसेच प्रशिक्षण व फेलोशिपच्या मर्यादित संधीमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. प्रमुख मागण्यांमध्ये एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा,
विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच स्वच्छ प्रतिमेच्या नवीन अध्यक्षांची नेमणूक करावी, एमपीएससी च्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, राजस्थान सरकारच्या धर्तीवर १०० रुपयांच्या कार्डवर वर्षभरातील सर्व परीक्षा घ्याव्यात, पुढील काही दिवसांत ७० हजार पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात यावी. आदि प्रमुख पाच मागण्यांचा समावेश आहे.

– कोल्हापूर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस – एस पीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेपरफुटी विरोधात जोरदार निदर्शने
हा केवळ परीक्षा व नोकरीचा प्रश्न नसून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे वरील मागण्यांची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री, संबंधित विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोहोचवून कालबद्ध निर्णयासाठी पाठपुरावा करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, विद्यार्थी शहराध्यक्ष गणेश नलवडे, युवती जिल्हाध्यक्ष निकिता माने, शहराध्यक्ष पल्लवी भोसले, पदवीधर संघटना मोहन कांबळे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष प्रेम भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकमानस न्यूज व्यवस्थापकीय संपादक स्वरूप तेली.

न्यूज व जाहिरातीसाठी संपर्क – 97 67 38 40 91. / 98 60 28 22 89.

Our Visitor

5 4 8 5 9 4
Views Last 30 days : 65
Total views : 549013

You may also like

error: Content is protected !!