मुलात महाराष्ट्र हायस्कूल तर मुलीत उशाराजे गर्ल्स हायस्कूल अजिंक्य
– विद्यापीठ हायस्कूलवर ४ – ० गोलने तर छत्रपती शाहू विद्यालय एसएससीवर २-० गोलने पराभूत
– प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर आयोजित मनपा स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा
कोल्हापूर : (लोकमानस न्यूज : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
पन्हाळा येथील संजीवन विद्यानिकेतनच्या मैदानावर सुरू असलेल्या प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर आयोजित १७ वर्षाखालील मुले मुली मनपास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य व अंतिम सामने खेळविण्यात आले. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने विद्यापीठ हायस्कूलवर ४ – ० गोलने एकतर्फी मात करून विजेतेपद पटकावले. तर सतरा वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात उषाराजे हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालय एसएससीवर २-० गोलने विजय मिळवून अजिंक्यपद पटकावले.

उपांत्य व अंतिम सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे,
*१७ वर्ष मुले*
सेमी १. महाराष्ट्र हायस्कूल विजय विरुद्ध सौ स. म. लोहिया हायस्कुल ६-० महाराष्ट्र कडून राजवीर खराडे तीन संचित उपलानी ऋतुराज वीर सम्राट मोरबाळे प्रत्येकी एक गोल.
सेमी २. विद्यापीठ हायस्कूल विजयविरुद्ध कोल्हापूर हायस्कूल 1-0 विद्यापीठ कडून पार्थ सुतार 1 गोल
तृतीय क्रमांक : कोल्हापूर हायस्कूल विजयविरुद्ध सौ स म लोहिया हायस्कुल सामना गोल्ड शून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरवर कोल्हापूर हायस्कुलने सौ स म लोहिया हायस्कुलवर ३-२ बोलणे विजय मिळवला.
अंतिम सामना : महाराष्ट्र हायस्कूल विजयविरुद्ध विद्यापीठ हायस्कूल ४-० महाराष्ट्र कडून साईराज पाटील २, राजवीर खराडे, सम्राट मोरबाळे प्रत्येकी एक गोल केला.
अंतिम विजयी संघ : अजय वडार, श्रीराम रजपूत, सार्थक विटेकर, वंश आगावणे, ऋतुराज वीर, सम्राट मोरबाळे, साईनाथ सुतार, केदार सोनाळे, साईराज पाटील, संचित उपलानी, संकेत जाधव, अर्णव शिंदे, श्लोक माळी, राजवीर खराडे, पृथ्वेश बागडेकर, श्रेयश धुमाळ.
क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे व्ही. एस. पाटील शरद मेढे सूर्यजित घोरपडे सतीश भोसले संतोष पोवार.

१७ वर्ष मुली
अंतिम सामना : उषाराजे हायस्कूल विजयविरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय एसएससीवर २-० गोलने मात केली. उषाराजेकडून सही नलवडे, प्रांजली गाडीवडर यांनी प्रत्येकी एक गोल केला.
विजयी संघ : आदिती पाटील, समृद्धी जाधव, सई नलवडे, श्रुती निपाणीकर, शिवांजली खरबडे, शर्वरी कोरे, वैष्णवी हजारे, महेक शेख, प्रांजली गाडीवडर, पूर्वी पोवार, पायल जाधव, जान्हवी पाटील, आर्या कांबळे, आरोही चव्हाण, आराध्या शिंदे, सृष्टी वांद्रे, क्रीडा शिक्षक रघु पाटील, मार्गदर्शक चव्हाण सोनल.
स्पर्ध्येला पंच म्हणून कामकाज : गजानन मनगुतकर, निरंजन कमते, शरद शिर्के, ओंकार लोकरे, पृथ्वीराज अवघडे, प्रसाद कोरडे, अक्षय मंडलिक, संकेत साळुंखे, संदीप पाटील , ऋषिकेश दाभोळे.
स्पर्धा आयोजन मनपा क्रीडा निरक्षक सचिन पांडव, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण यांनी केले.
———————-+
प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर आयोजित मनपा स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा

दरम्यान, सदर स्पर्ध्यातील सर्व विजयी, उपविजयी, तृतीय संघास राष्ट्रीय शालेय फुटबॉल खेळाडू कै. अवधूत राजेंद्र घारगे यांचे स्मरणार्थ अवधूत घारगे फाउंडेशन यांचे वतीने राजेंद्र घारगे यांनी आकर्षक ट्रॉफी देण्यात आली
बक्षीस वितरण समारंभावेळी पोलीस शहर उपअधीक्षक व व्हॉलीबॉल खेळाडू प्रिया पाटील, उपमहापौर व राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अक्षय जरग, सभापती प्राथमिक शिक्षण समिती शिला सोनुले, नगरसेवक व राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अश्किन आजरेकर, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र घारगे, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू व सेवानिवृत्त पोलीस सुनिल ठोंबरे, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, महाराष्ट्र हायस्कुल प्राचार्य एस ए जाधव, कोल्हापूर सॉकर रेफ्रि असोसिएशन सेक्रेटरी प्रदीप साळोखे, क्रीडा शिक्षक सुरेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर आदी उपस्थित होते.
दि. 20.7.2026 रोजी संजीवन विद्यानिकेतनचे सौरभ भोसले व फुटबॉल कोच अमित साळोखे यांचे सहकार्याने सदर स्पर्धा संजीवन विद्यानिकेतन, पन्हाळा येथे पार पडल्या तर बक्षीस समारंभ आज 21.7.2026 रोजी उपरोक्त मान्यवारांच्या उपस्थितीत विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडला.*
Our Visitor
Views Last 30 days : 83
Total views : 548754