छत्रपती शाहू विरुध्द उषाराजे यांच्यात आज अंतिम लढत

- उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल व प्रायव्हेट हायस्कूल पराभूत : मनपा स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा. - महाराष्ट्र , सौ स.म. लोहिया , कोल्हापूर हायस्कूल , विद्यापीठ पुढील फेरीत दाखल.

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी – नंदकुमार तेली).

मनपास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुली गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात उषाराजे हायस्कूलने सेंट झेवियर्स हायस्कूलवर टायब्रेकरमध्ये ३ – ० गोलने तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय एसएससीने प्रायव्हेट हायस्कूलवर टायब्रेकरमध्ये १ – ० गोलने मात केली. दोन्ही विजयी संघांनी अंतिम फेरीत धडक मारली. तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सेंट झेविअर्स हायस्कुलने प्रायव्हेट हायस्कुलवर टायब्रेकरमध्ये २ – १ गोलने मात करुन तृतीय क्रमांक पटकविला. तसेच १७ वर्षाखालील मुले गटात झालेल्या चार सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल , सौ स.म. लोहिया हायस्कूल , कोल्हापूर हायस्कूल , विद्यापीठ हायस्कुलने प्रतिस्पर्धी संघांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश केला.

छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर आयोजित मनपास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत शनिवारी १७ वर्षाखालील मुली गटातील दोन उपांत्य सामने, तृतीय क्रमांकासाठीचा सामना तर १७ वर्षाखालील मुले गटातील चार सामने खेळविण्यात आले.


सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे, १७ वर्षाखालील मुली गट (दोन उपांत्य सामने व तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्याचा सविस्तर निकाल )
पहिला उपांत्य सामना उषाराजे हायस्कूल विरुद्ध सेंट झेवियर्स हायस्कूल यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उषाराजे हायस्कूलने सेंट झेवियर्स हायस्कूलवर टायब्रेकरमध्ये ३ – ० गोलने विजय संपादन करुन अंतिम फेरीत धडक मारली.
दुसऱ्या उपांत्य सामना छत्रपती शाहू विद्यालय एसएससी विरुद्ध प्रायव्हेट हायस्कूल यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरमध्ये छत्रपती शाहू विद्यालयाने प्रायव्हेट हायस्कूलवर १ – ० गोलने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दरम्यान, तिसऱ्या क्रमांकासाठी सेंट झेविअर्स हायस्कुल विरुद्ध प्रायव्हेट हायस्कुल यांच्यात झालेला सामना पूर्णवेळ बरोबरीत राहिला. टायब्रेकरमध्ये सेंट झेविअर्स हायस्कुलने प्रायव्हेट हायस्कुलवर २ – १ गोलने विजय मिळवून तृतीय क्रमांक पटकविला.


१७ वर्षाखालील मुले गट (चार सामन्यांचा सविस्तर निकाल )
पहिल्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने महावीर इंग्लिश स्कूलवर ४ – ० गोलने एकतर्फी मात केली. यामध्ये महाराष्ट्रकडून सम्राट मोरबाळे , संचित उपलानी, राजवीर खराडे, ऋतुराज वीर यांनी प्रत्येकी एक गोल केला.
दुसऱ्या सामन्यात सौ स.म. लोहिया हायस्कूल विरुद्ध सेंट झेवियर्स हायस्कूल यांच्यातील सामना १ – १ गोल बरोबरीत राहिला. सामन्यात स.म. लोहियाकडून हर्ष भालकर तर झेवीअर्सकडून सॅम देशमुख यांनी प्रत्येकी एक गोल केला. टायब्रेकरमध्ये सौ स.म. लोहिया हायस्कूल ने सेंट झेवियर्स हायस्कूलवर विजय संपादन केला.
तिसऱ्या कोल्हापूर हायस्कूल विरुद्ध शांतिनिकेतन स्कूल यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरमध्ये कोल्हापूर हायस्कूलने शांतिनिकेतन स्कूलवर ३ -१ गोलने विजय मिळविला.
चौथा विद्यापीठ हायस्कुल विरुद्ध कोल्हापूर पब्लिक स्कुल यांच्यातील सामना १ – १ गोल बरोबरीत राहिला. विद्यापीठकडून विभव निकम तर कोल्हापूर पब्लिक स्कुलकडून नील जोखे यांनी प्रत्येकी एक गोल केला. चुरशीचा झालेल्या सामन्यात विद्यापीठ हायस्कूलने सदनडेथवर कोल्हापूर पब्लिक स्कुलवर विजय मिळविला.


चौकट –
उद्या दि १९ रोजी होणारे सामने
१७ वर्षाखालील मुली गट अंतिम सामना : उषाराजे हायस्कुल विरुद्ध छ. शाहू विद्यालय एसएससी.
१७ वर्षाखालील मुले गट
– पहिला उपांत्य सामना महाराष्ट्र हायस्कुल विरुद्ध सौ. स. म. लोहिया हायस्कुल.
– दुसरा उपांत्य सामना कोल्हापूर हायस्कुल विरुद्ध विद्यापीठ हायस्कुल.
– उपांत्य सामन्यातील पराभूत संघात तृतीय क्रमांकासाठीचा सामना.
– उपांत्य सामन्यात विजयी संघातील अंतिम सामना.

Our Visitor

5 4 8 4 7 8
Views Last 30 days : 81
Total views : 548752

You may also like

error: Content is protected !!