केएमएतर्फे डॉक्टर्स डे निमित्त सामाजिक उपक्रम

- ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान, शिबीरात डॉक्टरांनी केले रक्तदान

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

डॉक्टर्स डे निमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने बुधवारी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान, रक्तदान शिबीराचा समावेश होता. या शिबीरात डॉक्टरांनी रक्तदान करुन समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून दिला.


ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान
डॉ.बी.सी.रॉय यांना मानवंदना म्हणून दरवर्षी एक जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टरांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोल्हापुरातील ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. एस.आर.पाटील, डॉ.प्रकाश गणपुले, डॉ.सिद्धेश्वर भंडांगे, डॉ.प्रतिभा भूपाळी, डॉ. कुसुमताई वाळुंजकर (सेलमोकर) यांना त्यांच्या घरी जाऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


स्वतः डॉक्टरांनी केले रक्तदान
तसेच अध्यक्ष डॉ ए.बी.पाटील यांनी डॉ.बी.सी रॉय यांच्या प्रतिमेस अभिवादन करून डॉक्टर डे चे महत्व विशद केले. डॉक्टर्स डे निमित्त बुधवारी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये स्वतः डॉक्टरांनी रक्तदान करून समाजामध्ये रक्तदानासाठीचा संदेश दिला. यावेळी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ए.बी.पाटील, उपाध्यक्ष डॉ.अरुण धुमाळे, सचिव डॉ.अर्जुन आडनाईक, माजी अध्यक्ष डॉ. आर एम कुलकर्णी, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ.संदीप पाटील, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. गुणाजी नलवडे , डॉ. राजेंद्र चिंचणीकर, डॉ. इंद्रनील जाधव, डॉ. डी.ए.पाटील आदींसह डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

Our Visitor

5 4 8 5 9 4
Views Last 30 days : 65
Total views : 549013

You may also like

error: Content is protected !!