सजावटीच्या ‘इकोफ्रेंडली’ साहित्याच्या मागणीत वाढ

- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मंडप उभारणीसह सजावटीच्या कामात व्यस्त - घरगुती गणरायाच्या आगमनासाठी बालचमूसह कुटुंबीयांचाही सजावटीवर भर - सजावटी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह महिलावर्ग, बालचमूंची लगबग सुरु

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

अवघ्या दहा दिवसांवर असलेल्या महाराष्ट्रीतील सर्वात मोठा गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे मंडप उभारणीसह सजावट, कृत्रिम देखावे तयार करण्यात कार्यकर्ते व्यस्त आहेत. तर घरगुती गणरायाच्या आगमनासाठी बालचमूसह कुटुंबातील सदस्यांनी वेळात वेळ काढून सजावट करण्यावर भर दिला आहे. तसेच बाजारपेठेत सजावटी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह महिलावर्ग, बालचमूंची लगबग सुरु झाली आहे. एकुणच यंदाच्या गणेशोत्सवात सजावटीसाठी ‘इकोफ्रेंडली’ साहित्याच्या मागणीत वाढ झाली आहे.


इकोफ्रेंडली’ साहित्याला मागणी वाढली
शहरासह उपनगरामधील घराघरात गणरायाच्या आगमनासाठी सजावटीची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात थर्माकोल, प्लास्टिकच्या सजावटीला नागरिकांनी नाकारले आहे. याला पर्याय म्हणून लाकूड, बांबू, कागद, कापूस, कापड, ताग, पोफळीची पाने, केळीची आदींच्या किंमत अधिक असून देखील खरेदीला पसंती दिली आहे. एकुणच यंदाच्या गणेशोत्सवात ‘इकोफ्रेंडली’ साहित्याला मागणी वाढली आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही सजावटीला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.


बाजारपेठेत मखर, फरचे कापड, कापडी पडद्यांची रेलचेल
इको फ्रेंडली आरास करण्यासाठी नागरिकांनी पसंती दिली आहे. यामध्ये लाकडी पाट, एमडीएफ मखर, बांबूच्या काड्या, तागाची दोरी, पाकळ्या व जुन्या पुठ्ठयापासून तयार केलेली सजावट आदींचा समावेश आहे. तसेच फरचे कापड, लेकरा, वेलवेट, कोरीयन कापड, नेट कापड, विविध रंगातील पडदे आदींचा समावेश आहे. यामध्ये कापडी पडद्यांची किंमत ७० ते ३०० रुपये, तोरण ५० ते ४०० रुपये, तर एचडी थ्रीडी प्रिंटिंग पडदे ३५० ते ११०० रुपये आहेत. स्वच्छ, पांढरा शुभ कापूस १५० ते २०० रुपये किलो, तर १ बाय ४, ३ बाय ६ आणि ४ बाय ८ फूट आकारातील तयार बॅकड्रॉप ४५० ते ५०० रुपये दराने विकले जात आहेत. प्लॅस्टिकची सुटी फुले २ ते ८ रुपये नग मिळत असून, त्याऐवजी कापडी फुलांना १५ रुपये नग दराने मागणी आहे. तोरण, हार, कृत्रिम फुले, कापूस, फुलांचे तयार पट्टे तसेच एचडी थ्रीडी प्रिंटिंगचे पडदे उपलब्ध झाले आहेत.

Our Visitor

5 4 8 5 4 3
Views Last 30 days : 75
Total views : 548916

You may also like

error: Content is protected !!