कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
पोलो ग्राउंडवर सुरू असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित शासकीय शालेय मनपास्तर १९ वर्षाखालील मुले गटातील फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजने सौ स म लोहिया हायस्कूल व ज्युनियर कॉलेजवर ३-० गोलने मात करुन अजिंक्यपद पटकविले.
१९ वर्षाखालील मुले गटातील अंतिम सामन्याचा निकाल
अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज संघाने सौ स म लोहिया हायस्कूल व ज्युनियर कॉलेज संघावर ३-० गोलने एकतर्फी मात करुन विजेतेपद पटकविले. महाराष्ट्र हायस्कूल संघाकडून मंथन देसाई २ तर प्रणव यादवने १ गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

विजयी महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज संघ : ईशान हिरेमठ, पृथ्वीराज पाटील, प्रणव यादव, प्रथमेश बडगुजर, मयूर सुतार, तन्मय घोरपडे, शुभम कांबळे, स्वरूप बागडेकर, मंथन देसाई, कार्तिक निकम, सर्वेश गवळी, शौर्य गवळी, स्वरूप सुतार, सुयश सावंत, पृथ्वीराज साळोखे, ब्राईन चॅको, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, शरद मेढे.
तत्पूर्वी, झालेल्या तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज विरुद्ध डॉ डी वाय पाटील जुनियर कॉलेज ताराबाई पार्क यांच्यातील सामना गोलशून्य राहिला. टायब्रेकरमध्ये
न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने डॉ डी वाय पाटील जुनियर कॉलेजवर १-० गोलने मात करुन तृतीय क्रमांक मिळविला
स्पर्धेचे बक्षीस वितरण क्रीडा समिती सभापती कोमनपा विजयसिंह खाडे पाटील, केएसचे नंदकुमार बामणे, मुख्याध्यापक एस ए जाधव, प्राचार्या एस बी पाटील, सेक्रेटरी सॉकर रेफ्रि असोसिएशन प्रदीप साळोखे, जेष्ठ सेवा निवृत्त क्रीडा शिक्षक युवराज मोळे, नानासाहेब पाटील, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, सुरेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले
महावीर, शाहू, शिवाजी मराठा, न्यू इंग्लिश, दादासाहेब मगदूम,कोल्हापूर हायस्कूल विजयी
दरम्यान, १७ वर्षाखालील मुले गटातील आठ सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे, पहिल्या सामन्यात महावीर इंग्लिश स्कूलने भारतीय विद्यापीठ इंग्लिश स्कूलवर १-० गोलने मात केली. यामध्ये महावीरकडून विरवर्धन पाटीलने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय एस एस सी संघाने जीवनकल्याण माध्यमिक विद्यालय संघावर ३-१ गोलने विजय संपादन केला. यामध्ये शाहूकडून पृथ्वीराज पिसाळ, अर्णव सचदेव, आलिश शेखलाल यांनी प्रत्येक एक तर जीवनकल्याणकडून समर्थ पाटीलने एकमेव गोल केला. तिसऱ्या सामन्यात शिवाजी मराठा हायस्कूल विरुद्ध नेहरू हायस्कूल यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरमध्ये शिवाजी मराठा हायस्कूलने ३-० गोलने सामना जिंकला. चौथ्या सामन्यात न्यू इंग्लिश मीडियम स्कूल जरगनगर विरुद्ध फ्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातील सामना गोलशून्य राहिला. टायब्रेकरमध्ये न्यू इंग्लिश स्कूलने १-० गोलने सामन्यात विजय मिळविला.
पाचव्या सामन्यात दादासाहेब मगदूम हायस्कूलने देशभूषण हायस्कूलवर १-० गोलने मात केली. यामध्ये दादासाहेब मगदूमकडून सुयश राणेने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सहाव्या सामन्यात कोल्हापूर हायस्कूलने राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूलवर ३-० गोलने एकतर्फी मात केली. यामध्ये कोल्हापूर हायस्कूलकडून समर सरोदेने २ तर चैतन्य दुर्गुळेने १ गोल करून संघाच्या विजयात मोलाचे कामगिरी केली. सातव्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने महावीर इंग्लिश स्कूलवर ३-० गोलने एकतर्फी विजय संपादन केला. यामध्ये महाराष्ट्रकडून संकेत जाधव, अर्णव शिंदे, सम्राट मोरबाळे यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. आठव्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय एसएससी जुनियर कॉलेजने शिवाजी मराठा हायस्कूलवर ३-० गोलने एकतर्फी विजय मिळविला. यामध्ये शाहू विद्यालयकडून पृथ्वीराज पिसाळने २ तर यश पाटीलने एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
Our Visitor
Views Last 30 days : 75
Total views : 548916