१) कॅप्शन – अंबाई जलतरण तलावाशेजारील उद्यानाच्या लगत असणाऱ्या तलावाची संरक्षक भिंतच झाली आहे अदृश्य.
२) कॅप्शन – झाडाझुडपांसह बॅरेकेट्सचा उरला आधार
कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
रंकाळ्याच्या सभोवताली असणाऱ्या चौपाटीवरील संरक्षक भिंतीची प्रचंड दुरावस्था झाली आहे. तर अंबाई जलतरण तलावाशेजारील उद्यानाच्या लगत असणाऱ्या तलावाची संरक्षक भिंतच अदृश्य झाली आहे. याठिकाणी झाडाझुडपांसह बॅरेकेट्सचा आधार उरला आहे. ही गंभीर बाब असून याकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षम्यू दूर्लक्ष होत आहे. मोठी दूर्गटना घडल्यानंतर महानगरपालिकेला जाग येणार का ? असा प्रश्न रंकाळाप्रेमींतून उपस्थित केला जात आहे. तसेच मनपाच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

अबालवृध्दांच्या जिवितास धोका
उद्यानालगत असणारी रंकाळा तलावाची संरक्षक भिंत अदृश्य झाली आहे. उद्यानांमध्ये कुटुंबासह येतात संरक्षक भिंत नसल्यामुळे लहान मुले खेळताना तलावाकडे जाउन संरक्षक भिंत नसल्याने जिवितास धोका होउ शकतो. तसेच रंकाळ्याच्या सभोवताली असणाऱ्या चौपाटीच्या संरक्षक भिंतीचा सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांसह पर्यटकांना बसण्यासाठी आधार होता. मात्र, सध्या या संरक्षक भिंतीची उंची कमी झाली आहे. फिरायला येणारे नागरिक यावर बसतात, उंची लहान असल्याने तोल जाउन तलावात पडून जिवितास धोका होउ शकतो, यासाठी रंकाळ्याच्या सभोवताली असणाऱ्या संरक्षक भिंतीची उंची वाढविण्यासह संरक्षक भिंत जुनी असल्याने दुरावस्था थांबवून ज्याठिकाणी भिंत नाही, त्याठिकाणी बांधणे अत्यावश्यक बनले आहे.

संरक्षक भिंतीची उंची कमी अन् पाण्याच्या पातळीत वाढ
पावसाळा सुरु असल्याने रंकाळा तलावातील पाण्याची पातळी वाढली असून काटोकाट भरला आहे. तलावातील पाणी पाहण्यासाठी पर्यटकांसह नागरिकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. सभोवताली चौपाटीवर पदपथ उद्यानांचा विकास झाला आहे. त्यामुळे सभोवताली असणाऱ्या जुन्या भिंतीची उंची कमी आहे. यामुळे भिंतीवर बसणे धोकादायक बनले आहे. तोल जाउन तलावात पडून जिवितास धोका होउ शकतो. एखादी मोठी दूर्घटना होण्यापूर्वी संरक्षक भिंतीचे काम होणे अत्यावश्यक बनले आहे.

रंकाळा संवर्धनाकडे अक्षम्य दूर्लक्ष
पावसाळा सुरु होण्यापूर्वी रंकाळा संवर्धन होणे आवश्यक होते. मात्र, रंकाळा तलावातील पाण्यात अविरत मिसळणारे सांडपाणी रोखण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले. सांडपाणी मिसळल्याने दुर्गंधीयुक्त पाण्यात जलचर प्राण्यांनाही धोका निर्माण झाल्याने अनेक मासे मृत्यूमुखी पडले. यानंतर पावसाळा सुरु झाला. मुसळधार पावसाने रंकाळा तलाव भरला. मात्र, संवर्धनाअभावी रंकाळ्यातील पाणी दुर्गंधीयुक्तच राहिले. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे अत्यावश्यक बनले आहे. संरक्षक भिंत बांधणे, संवर्धनाचे काम केंव्हा होणार? असा यक्ष प्रश्न नागरिकांना पडला आहे. तरी महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून जोर धरली आहे.
चौकट
दोन वर्षांपासून निधीची प्रतिक्षा
गेल्या वर्षी हा निधी मिळाला नसल्याने संरक्षक भिंत बाधण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. गेल्या दोन वर्षांपासून निधीची प्रतिक्षा लागून राहिली आहे. यंदाच्या वर्षी पुन्हा जिल्हा नियोजन मंडळाकडे रंकाळ्याची संरक्षक भिंतीच्या संवर्धनासाठी १ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मिळावा, यासाठी इस्टीमेट सादर केले आहे. हा निधी मिळाल्यानंतर तत्काळ संरक्षक भिंत बांधणार आहे.
(उपशहर अभियंता महादेव फुलारी, गांधी मैदान विभाग कार्यालय)
Our Visitor
Views Last 30 days : 75
Total views : 548916