शहरासह उपनगरात गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी

- करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर, दत्त भिक्षालिंग, साई मंदिर, श्रीकृष्ण सरस्वती, गजानन महाराज, स्वामी समर्थसह विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी

कॅप्शन : – गुरुपोर्णिमानिमित्त बुधवारी दत्त भिक्षालिंग मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
शहरासह उपनगरामध्ये गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपोर्णिमेनिमित्त करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर, दत्त भिक्षालिंग, साई मंदिर, श्रीकृष्ण सरस्वती, गजानन महाराज, स्वामी समर्थ, गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.


शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या दत्त भिक्षालिंग मंदिरामध्ये गुरुपोर्णिमा बुधवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे साडेपाच वाजता दत्त भिक्षालिंग मंदिरात पाद्यपुजा, श्री पादूकांवर व शिवलिंगावर पंचामृत अभिषेक, रुद्र पठणसह धार्मिक विधी, पाणाफुलांची आकर्षक पुजा, सजावट करण्यात आली होती. ही पुजा मंदिराचे पुजारी पुरोहित पंकज दादर्णे यांनी बांधली होती. सकाळी आठ वाजल्यापासून द्रोणातून दर्शनासाठी आलेल्या भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला. या मंदिरासह विविध मंदिरात गुरुपोर्णिमेनिमित् भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.


गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।। च्या मंत्रोच्चाराने बुधवारच्या दिवसाला सुरुवात झाली. आपल्या जीवनात अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या आई, वडील, शिक्षक आदींसह मार्गदर्शकांना अभिवादन करुन दिवसाची सुरुवात झाली. यानंतर प्रत्यक्ष भेटून व साेशाल मिडियावरुन गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! देउन अबालवृध्दांकडून गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

Our Visitor

5 4 8 5 4 3
Views Last 30 days : 75
Total views : 548916

You may also like

error: Content is protected !!