एकदिवशीय आहार कार्यशाळा उत्साहात

- कोल्हापुर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट खेळाडूंसाठी आयोजन - कार्यशाळेत सर्व वयोगटातील ८० पेक्षा अधिक क्रिकेट खेळाडू, पालक, प्रशिक्षक व पंच सहभागी

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉलमध्ये मंगळवारी एकदिवशीय आहार (डाएट) संदर्भात कार्यशाळा उत्साहात पार पडली. कोल्हापुर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट खेळाडूंसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी कोल्हापूर जिल्हयातील सर्व वयोगटातील ८० पेक्षा अधिक क्रिकेट खेळाडू, पालक, प्रशिक्षक व पंच सहभागी झाले होते.


या एकदिवशीय कार्यशाळेत आहार (डाएट) याविषयाबर आहार तज्ञ डॉ निलीमा जिरगे यांनी खेळाडूंच्या खेळाच्या कार्यकाळात व व्यक्तीगत जिवनात आपल्या आहाराचा समतोल कसा राखावा., याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये प्रथिने (प्रोटीन) कार्बोदके (कार्बोहायड्रेट ) फायबर व पाणी हे शरीरासाठी किती उपयोगी आहे., याचे महत्व विषद केले. आहार शाकाहारी की मासांहार हे महत्वाचे नसुन आपण घेणारा आहारांचे प्रमाण महत्वाचे नसुन त्याचा दर्जा महात्वाचा असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी खेळाडू व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकाचे निरसन योग्य प्रकारे केले.
डॉ निलीमा जिरगे यांचे स्वागत संस्थेचे सचिव मदन शेळके यांनी स्मॄतीचिन्ह देवुन केले. यावेळी संस्थचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, उपाध्यक्ष अभिजीत भोसले, सहसचिव अजित मुळीक, डॉ संजय पाठारे, किरण रावण,, रहीमतनुर खान, साद मुजावर, ज्योती काटकर, कार्यशाळेचे सुत्रसंचालन व आभार जनार्दन यादव यांनी मानले.

Our Visitor

5 4 8 5 4 3
Views Last 30 days : 75
Total views : 548916

You may also like

error: Content is protected !!