कोल्हापूर: (लोकमानस न्यूज : स्वरूप तेली).
शाहूपूरी जिमखाना मैदान येथे सुरु असलेल्या कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व श्री हंबीरराव रंगराव पाटील (बापू) पुरस्कॄत “लक्ष्मी रंगराव कंरडक” महिला एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या अंतीम सामन्यात महाराणी प्रमिलाराजे साहसी महिला संघाने महाराणी लक्ष्मीबाई कर्तबगार महिला संघावर ४१ धावांनी मात करुन चषकावर कब्जा केला.
महाराणी प्रमिलाराजे साहसी महिला संघ विरूध्द महाराणी लक्ष्मीबाई कर्तबगार महिला संघ
अंतीम सामन्याची नाणेफेक उत्पादन शुल्क निरीक्षक पांडूरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. प्रथम फलदांजी करताना महाराणी प्रमिलाराजे महिला संघाने ४०.४ बाद १९४ धावा केल्या. यामध्ये स्वरा जाधव ४१, वॄंदा मेढे २८, सौम्यलता बिराजदार १८, कार्तीकी चव्हाण ११ धावा केल्या. महाराणी लक्ष्मीबाई कर्तबगार महिला संघाकडुन सॄष्टी पोवारने ४, संस्कॄती सणगरने २, उत्कर्षा जाधव व स्वराजंली पोवार यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना महाराणी लक्ष्मीबाई कर्तबगार महिला संघाने ३१.३ षटकांत सर्वबाद १०९ धावा केल्या. यामध्ये मधुरा इंगवले ३५, सिध्दी सकंपाळ ३२, उत्कर्षा जाधव ११ धावा केल्या. महाराणी प्रमिलाराजे महिला संघाकडून अर्पिता नायकवडीने ४, स्वरा जाधवने ३, वॄंदा मेढे व सौम्यलता बिराजदार यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. अशा प्रकारे महाराणी प्रमिलाराजे साहसी महिला संघाने ४१ धावांनी विजय संपादन करत लक्ष्मी रंगराव महिला कंरडक पटकावला.
चौकटी

विजयी संघ : सौम्यलता बिराजदार (कर्णधार), अर्पिता नायकवडी, कार्तीकी चव्हाण, कार्तीकी सोने, प्रियोष्णी देसाई, रिध्दी गायकवाड, सानवी भोसले, श्रेया कांबळे, सॄष्टी कांबळे, स्वरा जाधव, वॄंदा मेढे, पायल माने, राजवी दाभाडे, समिक्षा पाटील, संजना घेवारी, सई गोसावी, यशस्वी शेडबाळे.
उपविजयी संघ : मधुरा इंगवले (कर्णधार), प्राजंल चौगले, ऋतुजा खड्ड, संस्कॄती सणगर, सिध्दी सकंपाळ, सॄष्टी पोवार, सुदिक्षा देसाई, स्वरा भांबुरे, स्वराजंली पवार, तस्मीया कलावंत, उत्कर्षा जाधव, आरोही कळके, गिरीजा घोडके, गौरी दैने, मनाली पाटील, मिसबा सय्यद.

स्पर्धेतील व सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू
स्पर्धेतील मालीकावीर व उत्कॄष्ठ फलदांज सुदिक्षा देसाई (४ डावात १ शतक व दोन अर्धशतकासह ३४१ धावा व ४ बळी)., उत्कॄष्ठ गोलदांज अर्पिता नायकवडी ५ डावात एकुण ११ बळी., अंतिम सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच स्वरा जाधव ४१ धावा व ३ बळी.
Our Visitor
Views Last 30 days : 367
Total views : 548648