छत्रपती शाहू विद्यालय एसएससीची बाजी

- अंतिम सामन्यात सेंट झेविअर्स हायस्कुलवर १-० गोलने मात - शासकीय शालेय मनपास्तर १४ वर्ष मुली गटातील फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर  : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

पोलो ग्राउंड मैदानावर सुरु असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित शासकीय शालेय मनपास्तर १४ वर्ष मुली गटातील फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय एसएससीने सेंट झेविअर्स हायस्कुलवर १-० गोलने मात करुन बाजी मारली.
१४ वर्ष मुली गटातील अंतिम सामन्याचा निकाल
अंतिम सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय एसएससीने सेंट झेविअर्स हायस्कुलवर १-० गोलने मात करुन स्पर्धेत अव्वल स्थान पटकविले. शाहू विद्यालयकडून नीरजा जांभळेने एकमेव एक गोल करुन संघाच्या विजयात माेलाचा वाटा उचलला.
बक्षीस वितरण केएसएचे फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी, मनोज जाधव, सामाजिक कार्यक्रते आशिष मांडवकर, सेक्रेटरी सॉकर रेफ्रि असोसिएशन प्रदीप साळोखे यांच्या हस्ते व क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण, सिद्धार्थ कुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


विजयी छत्रपती शाहू विद्यालय एसएससी संघातील खेळाडूंची नावे : सर्वेशा बडीगर, परिणीता शिंदे, माहेश्वरी शिंदे, नंदिनी महाडिक, निरजा जांभळी, मिरा चव्हाण, केतकी चव्हाण, नारायणी देसाई, यशस्वी नेजदार, रिधिका मुडेकर, आराध्या घोरपडे, सुहाना शेख, स्वरांजली पुजारी, संचिता कुपते, प्रशिक्षक सोनाली क्षीरसागर.

Our Visitor

5 4 8 5 4 3
Views Last 30 days : 75
Total views : 548916

You may also like

error: Content is protected !!