“इतिहास – सामान्य ज्ञान” स्पर्धेत “माझी शाळा”च्या विद्यार्थ्यांचे यश

- जय भारत हायस्कूल व डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिरचा संयुक्त उपक्रम 

“इतिहास – सामान्य ज्ञान” स्पर्धेत “माझी शाळा”च्या विद्यार्थ्यांचे यश

– जय भारत हायस्कूल व डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिरचा संयुक्त उपक्रम 

– छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्या होत्या स्पर्धा

– स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग : परिसरातील 10 ते 12 शाळांना सहभागाचे प्रमाणपत्र 

(कोल्हापूर : “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

“इतिहास सामान्य ज्ञान” स्पर्धेत “माझी शाळा”च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी “इतिहास सामान्य ज्ञान स्पर्धा”  घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत “माझी शाळा” च्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी बजावली. या स्पर्धेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यशस्वी विद्यार्थ्यांना स्पर्धा संयोजक संस्थेकडून मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

माझी शाळा, भोसलेवाडी येथे शिक्षण घेणारे इतिहास सामान्य ज्ञान स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी अनुक्रमे असे, प्रथम क्रमांक सर्वेश सुनिल यादव,  द्वितीय क्रमांक  श्लोक राहुल गायकवाड, तृतीय क्रमांक चिन्मय शरद माळी या तिघांचा समावेश आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेकडून मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देऊनही गौरविण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यावेळी या सर्व कार्यक्रमास शिक्षक, पालक वर्ग  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जय भारत शिक्षण संस्थेत इतिहास सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण

या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख अतिथी उद्योगपती अर्चना धोंड यांच्या हस्ते करण्यात आले.    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे  मान्यवरांच्या हस्ते पूजन व अभिवादन करून  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष सुमित्रा जाधव होत्या. प्रमुख पाहुण्या अर्चना धोंड यांनी प्रेरणा गीताचे गायन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासह प्रेरित केले. कार्यक्रमाचे अध्यक्षा सुमित्रा जाधव यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास मनी रुजवावा, असे प्रतिपादन केले. यावेळी गट-१(१ली ते ४थी),गट-२( ५वी ते ७वी),गट -३( ८वी ते १०वी) यामध्ये अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात आले.

स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग

जय भारत शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित डॉ.श्रीधर सावंत विद्यामंदिर व जय भारत हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या इतिहास सामान्य ज्ञान स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला होता.

परिसरातील 10 ते 12 शाळांना सहभागाचे प्रमाणपत्र 

तसेच या स्पर्धेतील सहभागी परिसरातील 10 ते 12 शाळांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.डॉ.श्रीधर सावंत विद्यामंदिरचा इ.२ री चा विद्यार्थी कु.मनवीत अरमने व इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कु.सार्थक गावडे यांनी गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये कोल्हापूर केंद्रात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी माझी शाळेची शिक्षक गवळी व उषाराजे हायस्कूलच्या चव्हाण यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी पाटील यांनी, सूत्रसंचालन वैभव अंबपकर तर आभार एम.वाय्. निकाडे यांनी मानले. या कार्यक्रमास यशस्वी विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक ,शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Our Visitor

5 4 8 4 3 0
Views Last 30 days : 367
Total views : 548648

You may also like

error: Content is protected !!