कॅप्शन – छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या मनपास्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेतील बुधवारी झालेल्या सामन्यातील एक क्षण.
कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी – नंदकुमार तेली).
छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित मनपा स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत बुधवारी १७ व १५ वर्षाखालील मुले गटातील एकुण दहा सामने खेळविण्यात आले. शांतिनिकेतन छत्रपती शाहू सेंट झेवियर्स स. म. लोहिया संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश केला.

बुधवार दि १५ जुलै २०२६ रोजी झालेल्या सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे, १७ वर्षाखालील मुले गटातील पहिल्या सामन्यात शांतिनिकेतन स्कूलने दादासाहेब मगदूम हायस्कूलवर २-० गोलने मात केली. यामध्ये शांतिनिकेतनकडून शौर्यवीर काटकर, आर्यन थोरशे यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी)ने प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलवर २-१ गोलने विजय मिळविला. शाहूकडून मिथिलेश जाधव, साई साखळकर तर प्रिन्स शिवाजीकडून आदित्य शिंदे एक गोल केला. तिसऱ्या सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूलने फोर्ट इंटरनॅशनल स्कुलवर ३-० गोलने एकतर्फी मात केली. झेवियर्सकडून सोवेन खाडे, सार्थक तुळशीकर, मुगेंद्रसिंह जाधव यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चौथ्या सामन्यात सौ. स. म. लोहिया हायस्कूलने न्यू हायस्कूलवर १-० गोलने मात केली. लोहियाकडून अथर्व हेगडेने सामन्यातील एकमेव गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

तत्पूर्वी, झालेल्या १५ वर्षाखालील मुले गटातील पहिल्या सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूलने संजीवन इंग्लिश स्कूल, रंकाळावर ३-० गोलने एकतर्फी मात केली. झेविअर्सकडून रुद्र स्वामी, अर्जुन साळोखे, अर्जुन चिपळूणकर यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात कोल्हापूर पब्लिक स्कूल विरुद्ध सौ. स. म. लोहिया हायस्कूल यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरवर कोल्हापूर पब्लिक स्कूलने स. म. लोहियावर ४ – ३ गोलने मात केली. तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालयावर ३-० गोलने एकतर्फी मात केली. यामध्ये महाराष्ट्र हायस्कूलकडून रणवीर पाटीलने २ तर वेदांत नलावडेने एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चौथ्या सामन्यात पोदार स्कूलने शांतिनिकेतन स्कूलवर १-० गोलने मात केली. पोदारकडून प्रणव बिराजदारने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पाचव्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी)ने सेंट झेविअर्स हायस्कुलवर १-० गोलने मात केली. यामध्ये शाहूकडून रोनक मुदगलने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सहाव्या सामन्यात कोल्हापूर पब्लिक स्कुल विरुद्ध जयभारत हायस्कूल यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरवर कोल्हापूर पब्लिक स्कूलने जयभारत हायस्कूलवर ५-४ गोलने मात केली.
Our Visitor
Views Last 30 days : 83
Total views : 548754