केडीसीएचा वार्षिक पारितोषक व खेळाडू गौरव समारंभ उत्साहात

- राज्यस्तरीय संघात निवड झाल्याबद्दल खेळाडूंचा गौरव, विशेष प्रोत्साहनपर बक्षिस, उत्कॄष्ठ महिला खेळाडू पुरस्कार - विविध स्पर्धेतील विजेत्या संघांना विजेतेपद व उपविजेतेपदाची कायम स्वरूपाची ट्रॉफी

केडीसीएचा वार्षिक पारितोषक व खेळाडू गौरव समारंभ उत्साहात
– राज्यस्तरीय संघात निवड झाल्याबद्दल खेळाडूंचा गौरव, विशेष प्रोत्साहनपर बक्षिस, उत्कॄष्ठ महिला खेळाडू पुरस्कार

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

धैर्यप्रसाद हॉल येथे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन सन २०२६-२७ चा वार्षीक पारितोषक वितरण समारंभ डॉ अनिता बोडके, प्राचार्य राजाराम कॉलेज डॉ संजय दाभोळे , प्राचार्य न्यु इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) यांच्या प्रमुख उपस्थितीत व संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली शुभ हस्ते रविवारी उत्साहात संपन्न झाला .

सर्व स्पर्धाचा एकत्रीत पारितोषक वितरण समारंभ
सन २०२६-२७ या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या कै मुरलीधर सोमाणी १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा, कै बाबा भोसले कंरडक अ गट कै माजी आम दिनकारराव यादव स्पर्धा, श्री वसंतराव चौगुले ब गट ट्रॉफी, कै विलास(मेजर) यादव टी २० क गट ट्रॉफी, महाजन ­ कदम ग्रामीण टी २० ट्रॉफी, पाठारे १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा, १४ वर्षाखालील रायझिंग स्पर्धा व कै लक्ष्मी रंगराव पाटील महिला एकदिवशीय स्पर्धा या सर्व स्पर्धाचा एकत्रीत पारितोषक वितरण समारंभ आयोजीत करण्यात आला होता.
राज्यस्तरीय संघात निवड झाल्याबद्दल खेळाडूंचा गौरव
अनुजा पाटील, श्वेता माने, रणजीत निकम, अभिषेक निषाद, श्रेयस चव्हाण, यतीराज पाटोळे , अभिषेक आंब्रे, राजदिप मंडलीक या खेळाडूंची राज्यस्तरीय संघामध्ये निवड झाल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती, डॉ अनिता बोडके, डॉ संजय दाभोळे, कॅप्टन डॉ नितीन सोनजे, यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मॄतीचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
उत्कॄष्ठ महिला खेळाडू पुरस्कार
महिला खेळाडूंला प्रोत्साहन मिळावे हया उद्देशाने नव्याने सुरू केलेला उत्कॄष्ठ महिला खेळाडू कै. प्रतापसिंह शिंदे (तोरगलकर) यांच्या स्मरणार्थ कु अमॄता शिंदे (माजी महिला कसोटी खेळाडू ) यांच्या मार्फत रू १० हजार व स्मॄतीचिन्ह , उत्कॄष्ठ महिला खेळाडू पुरस्कार सई यवलुस्कर हीला प्रदान करणेत आला.
विशेष प्रोत्साहनपर बक्षिस
राजस्तरीय स्पर्धेमध्ये सातत्य पुर्ण कामगीरी करणा­या खेळाडूंना कु अनुजा पाटील, सेजल सुतार, अभिषेक निषाद, क्षितीज पाटील, श्रेयस चव्हाण, वैभव पाटील, ओम डी पाटील यांना कै डी एन उर्फ बाबा इंगळे यांच्या स्मरणार्थ इंगळे परिवारा तर्फे विशेष प्रोत्साहन पर बक्षिस रोख रक्कम स्वरूपात देण्यात आले.
उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार
यावेळी दरवर्षी कै बाबा भोसले यांच्या स्मरणार्थ भोसले कुंटुबियांच्या कडुन देण्यात येणारा उदयोन्मुख खेळाडू (बेस्ट ज्युनियर प्लेयर) पुरस्कार प्रज्वल पाटील याला शैलेश भोसले व अभिजीत भोसले यांच्या हस्ते रू ५ हजार व स्मॄती चिन्ह देउन गौरवण्यात आले. (प्रज्वल पाटील यांने १४ वर्षाखालील निमंत्रीत स्पर्धेत ७ डावात ३ अर्धशतकासह २९० धावा).


विविध स्पर्धेतील विजेत्या संघांना विजेतेपद व उपविजेतेपदाची कायम स्वरूपाची ट्रॉफी
यावेळी कै आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् ॲकॅडमीने कै बाबा भोसले कंरडक टी २० स्पर्धेचे विजेतेपद, तर कै बाबा भोसले कंरडक टी २० स्पर्धेचे उपविजेतेपद कागल तालुका क्रिकेट असोसिएशनने पटकावले , कै माजी आम दिनकरराव यादव अ गट स्पर्धेचे विजेतेपद, रमेश कदम किक्रेट ॲकॅडमीने व उपविजेतेपद कै आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् ॲकॅडमी अ ने पटकावले, श्री वसंतराव चौगुले ब गट स्पर्धेचे विजेतेपद सागरमाळ स्पोर्टस असोसिएशनने व उपविजेतेपद मंगलमुर्ती किक्रेट ॲकॅडमीने पटकावले, कै विलास(मेजर) टी २० क गटाचे विजेतेपद एस के फौडेशन गडहिंग्लज व उपविजेतेपद ओम क्रिकेट ॲकॅडमीने पटकावले, महाजन ­ कदम ग्रामीण टी २० स्पर्धेचे विजेतेपद शिरोळ तालुका क्रिकेट असोसिएशनने व उपविजेतेपद वाठार स्पोर्टस वाठारने पटकावले , कै मुरलीधर सोमाणी १९ वर्षाखालील स्पर्धेचे विजेतेपद शिवनेरी क्रिकेट क्लबने व उपविजेतेपद ईगल क्रिकेट ॲकॅडमीने पटकावले , पाठारे १६ वर्षाखालील स्पर्धेचे विजेतेपद प्रकाश फौडेशनने व उपविजेतेपद फायटर्स स्पोर्टस क्लबने पटकावले , १४ वर्षाखालील किक्रेट स्पर्धेचे विजेतेपद सेच्युरींयन स्पोर्टस फौडैशनने व उपविजेतेपद शिवनेरी क्रिकेट क्लबने पटकावले , लक्ष्मी रंगराव महिला एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद महाराणी प्रमिलाराजे महिला संघाने व उपविजेतेपद महाराणी लक्ष्मीबाई कर्तबगार महिला संघाने पटकावले . या सर्व संघाना विजेतेपद व उपविजेतेपदाची कायम स्वरूपाची ट्रॉफी प्रमुख पाहुणे व मान्यवर पुरस्कर्ते यांच्या हस्ते देऊन गौरविणेत आले.


दरम्यान, सदर समारंभावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक समारंभाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, डॉ अनिता बोडके, डॉ संजय दाभोळे, कॅप्टन डॉ नितीन सोनजे यांनी खेळाडूंना बहुमोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास अभिषेक सोनी संजयबाबा यादव, शैलेश भोसले, कुंटुबीय, चंद्रकांत महाजन, अशोकराव पाटील, वैभव पाटील, एन एन पाटील, बापूसाहेब मिठारी, विनोद डुंणुग, इंद्रजित चव्हाण, नितीन सावडेऀकर, प्रसाद पत्की उपस्थित होते तसेच आदी सर्व कार्यकारिणी सदस्य चेतन चौगुले, शीतल भोसले, रमेश हजारे, केदार गयावळ, जनार्दन यादव, अजित मुळीक, कॄष्णात धोत्रे, रोहन भुईंबर, राजेश केळवकर, किरण रावण, नितीन पाटील, रहीम खान, साद मुजावर, ज्योती काटकर, संस्थेचे सभासद खेळाडू सर्व स्थानिक क्लबचे प्रतिनिधी, प्रशिक्षक तालुका, प्रतिनिधी पंच स्कोरर, पालक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते . कार्यक्रमाचे स्वागत, सुत्रसंचालन संस्थचे जॉ सेक्रेटरी डॉ संजय पाठारे प्रास्ताविक संस्थेचे सचिव मदन शेळके यांनी केले. संस्थेच्या कार्याचा आढावा अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला. तर आभार स्पर्धा कमिटी अध्यक्ष कॄष्णा धोत्रे यांनी मानले .

Our Visitor

5 4 8 4 7 8
Views Last 30 days : 83
Total views : 548754

You may also like

error: Content is protected !!