कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी – नंदकुमार तेली).
रोटरी क्लब ऑफ शिरोली एमआयडीसी यांचा पदग्रहण सोहळा उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी नुतन अध्यक्षपदी श्रीधर येसणे, सचिवपदी संदेश पाटील तर खजिनदारपदी प्रशांत मगदूम यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून पीडीजी संग्राम पाटील यांच्यासह सर्व सभासद यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
या कार्यक्रमास आराध्या येसणे व साक्षी साळवी यांच्या गणेश वंदना या नृत्याने सुरुवात करण्यात आली. क्लबचे माजी अध्यक्ष विक्रम सिंह जाधव यांनी आपले मनोगत मांडून कार्यक्रमाला सुरुवात केली. सचिव सौ. मानिनी जाधव यांनी त्याच्या कालावधीत वर्षभर केलेल्या कामाचा आढावा सर्व सभासदांसमोर ठेवला.

त्यानंतर नवीन अध्यक्ष श्रीधर येसणे, सचिव संदेश पाटील आणि खजिनदार प्रशांत मगदूम व त्यांचे सहकारी यांनी पदभार स्वीकारला. अध्यक्ष श्रीधर येसणे यांनी येणाऱ्या वर्षात समाज उपयोगी काम करण्याची ग्वाही दिली. यानंतर सर्व रोटरी मुव्हमेंट कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांचे आणि नवीन रोटरी मेंबर यांचे स्वागत करण्यात आले. सचिव संदेश पाटील यांनी आभार मानले.
Our Visitor
Views Last 30 days : 77
Total views : 548918