रोटरी क्लब रॉयल्सचा ५ वा पदग्रहण सोहळा उत्साहात

- रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरची नवीन कार्यकारणी जाहीर : नुतन अध्यक्षपदी स्मिता सावंत तर सचिवपदी तेजस्वी नायर यांची निवड

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी – नंदकुमार तेली).

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सचे ५ वा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी अध्यक्ष स्मिता सावंत, सचिव तेजस्वी नायर, खजनीस प्रियंका पोळ यांनी डिस्ट्रिक्ट ३१७० चे आयपीडीजी अरुण भंडारे यांच्या हस्ते पदभार स्वीकारत नवीन कार्यकारणी जाहीर केली.

तत्पूर्वी, मावळते अध्यक्ष एंजेला नोरेंज यांनी आपल्या मनोगतातून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सच्या कार्याचा आढावा घेतला. या अंतर्गत त्यांनी डिस्ट्रिक्ट ग्रँट मधून बेरकेवाडी येथे उभारण्यात आलेला बस थांबा, २ हॅप्पी स्कूलची स्थापना, यूथसाठी इंटरस्कूल फुलबॉल स्पर्धांचे आयोजन आदींसह वर्षभरातील लहान मोठ्या सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असल्याचे सांगितले. असिस्टंट गव्हर्नर दीपिका मर्दा यांनी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अमरदीप पाटील, लेखा साटम, माधवी भंडारे, रॉयल्सचे क्लब मेंबर्स व इतर क्लबचे सर्व रोटरी मोमेंटचे सदस्य, सविता पाटील, अँजेला नोरेंज यांनी सूत्र संचालन केले.

Our Visitor

5 4 8 4 7 8
Views Last 30 days : 83
Total views : 548754

You may also like

error: Content is protected !!