किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाची कोल्हापुरात सुरुवात

- राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळापासून काढण्यात आली भव्य रॅली

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
अखिल भारतीय किसान सभेच्या (एआयकेएस) २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाची सुरुवात मंगळवार दि ६ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळापासून निघालेल्या भव्य रॅलीने झाली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या रॅलीचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रीय महासचिव विजू कृष्णन, राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, राज्य उपाध्यक्ष तथा माजी आमदार जे. पी. गावीत आणि डॉ. उदय नारकर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, सीटूचे राज्य सचिव आमदार विनोद निकोले आणि शिवाजी मगदूम, जनवादी महिला संघटनेच्या राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर, स्वागत समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, स्वागत समितीचे उपाध्यक्ष बाबासाहेब देवकर यांच्यासह अनेकांनी केले.

कॅप्शन – अखिल भारतीय किसान सभेच्या (एआयकेएस) २४ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाची सुरुवात मंगळवार दि ६ ऑक्टोबर २०२६ रोजी झाली.
राज्य अध्यक्ष उमेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर शहीदांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षमंडळ आणि इतर समित्यांची निवड, शोकप्रस्ताव तसेच स्वागतपर भाषण झाले. विजू कृष्णन यांचे प्रभावी उद्घाटनपर भाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी भारतासमोरील कृषीविषयक आणि राजकीय आव्हानांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात, राजर्षी शाहू महाराज हे महान समाजसुधारक होते. त्यांनी मागासवर्गीय आणि महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. ते जातिव्यवस्थेचे प्रखर विरोधक होते. १९०२ साली त्यांनी दलितांसह मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षणाची सुरुवात करून भारतात सामाजिक आरक्षणाचा पाया घातला असल्याचे सांगितले.


या अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्राला २१ जिल्ह्यांतील ३०७ प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यामध्ये ३७ महिला प्रतिनिधींचा समावेश आहे. मंगळवारी दुपारी डॉ. अजित नवले यांनी १२४ पानी राजकीय, कृषी, कार्य आणि संघटनात्मक अहवाल मांडून प्रतिनिधी सत्राची सुरुवात केली. या अहवालावरील चर्चा उद्यापासून सुरू होणार आहे.

लोकमानस न्यूज व्यवस्थापकीय संपादक स्वरूप तेली.

न्यूज व जाहिरातीसाठी संपर्क – 97 67 38 40 91. / 98 60 28 22 89.

Our Visitor

5 4 8 5 9 3
Views Last 30 days : 66
Total views : 549012

You may also like

error: Content is protected !!