कोल्हापूर : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
आचार्य विद्यानंद संस्कृती भवन महावीर महाविद्यालय येथे कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद आयोजित १४, १७ व १९ वर्षाखालील मुलांच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेंतर्गत मंगळवारी झालेल्या अंतिम फेरीत मुलांत विवान, अभय, विरेश अजिंक्यपद पटकविले तर प्रेम, स्वरुप व अथर्व यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

स्विस लिग पद्धतीने एकूण सहा फेऱ्यात झालेल्या या स्पर्धेत अंतिम सहाव्या फेरीनंतर १४ वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित शिरोळचा विवान सोनी सहा पैकी सहा गुण मिळवून अजिंक्य ठरला. चौथा मनांकित प्रेम निचल कागल, बिगर मानांकित राघवेंद्र सावंत करवीर, तृतीय मानांकित आरव पाटील करवीर, बिगर मानांकित अलंकार तेली पन्हाळा व जयवर्धन दरेकर हातकणंगले या पाच जणांचे समान पाच गुण झाले होते. २२.५ टायब्रेक गुणामुळे प्रेम निचल उपविजेता ठरला तर राघवेंद्र मानेने २१(२४.५) टायब्रेक गुण घेत तृतीय स्थान मिळविले. आरव पाटीलने २१(२१) टायब्रेक गुणासह चतुर्थ स्थान ग्रहण केले तर अलंकार तेली २०.५ व जयवर्धन दरेकर १९.५ टायब्रेक गुणासह अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी राहिले.
१७ वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित शिरोळचा अभय भोसलेने सहापैकी सहा गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. द्वितीय मानांकित गडहिंग्लज चा स्वरूप साळवे, तृतीय मानांकित करवीरचा श्रवण कदम, चतुर्थ मानांकित पन्हाळ्याचा सतेज पाटील, पाचवा मानांकित कागल चा ओजस व्हनमाने व बिगरमानांकित हातकणंगलेचा ओजस हातगिणे या पाच जणांचे समान पाच गुण झाले होते. सरस टायब्रेक गुणांनुसार स्वरूप साळवे २२(२४)(१९) उप विजेता झाला तर श्रवण कदमला २२(२४)(१८) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सतेज पाटीलने २१ टायब्रेक गुनासह चौथा क्रमांक मिळविला. ओजस व्हनमाने (२०.५) व ओजस हातगिणे (१७.५) टायब्रेक गुनासह अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान मिळविले.
१९ वर्षाखालील मुलांच्या गटात सातवा मानांकित आजऱ्याचा विरेन बुजरे सहा पैकी सहा गुण घेऊन विजेतेपद मिळविले तर अग्रमानांकित शिरोळचा अथर्व पाटोळे पाच गुण व २२.५ टायब्रेक गुनासह उपविजेता ठरला. पन्हाळ्याच्या विवेक पवार ने पाच गुण व २०.५ टायब्रेक गुणासह तृतीय स्थान मिळविले. हातकलंगलेच्या सुमित गिरीला पाच गुण व २० टायब्रेक गुनासह चतुर्थ क्रमांक मिळाला. भुदरगडचा राजवीर चौगले पाच गुण व १८ टायब्रेक गुण घेत पाचवे स्थान मिळवले तर गडहिंग्लज च्या विनीत सुतारला पाच गुण व १५.५ टायब्रेक गुनासह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी गटनिहाय निवडण्यात आलेली पाच बुद्धिबळपटू खालील प्रमाणे
१४ वर्षाखालील मुले :- विवान सोनी शिरोळ, प्रेम निचल कागल, राघवेंद्र सावंत करवीर, आरव पाटील करवीर, अलंकार तेली पन्हाळा. , १७ वर्षाखालील मुले :- अभय भोसले शिरोळ, स्वरूप साळवे गडहिंग्लज, श्रवण कदम करवीर, सतेज पाटील पन्हाळा, ओजस व्हनमाने कागल. , १९ वर्षाखालील मुले :- विरेन बुजरे आजरा, अथर्व पाटोळे शिरोळ, विवेक पवार पन्हाळा, सुमित गिरी हातकणंगले, राजवीर चौगले भुदरगड. ,
१४, १७ व १९ वर्षाखालील मुलींच्या गटातील स्पर्धा मंगळवारी सुरू झाल्या. चौथ्या फेरीनंतर १९ वर्षाखालील मुलींच्या गटात शिरोळच्या अग्रमानांकित दिव्या पाटील,द्वितीय मानांकित दिशा पाटील व पाचवी मानांकित सांची बजाज या तिघीजणी चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात चौथ्या फेरीनंतर अग्रमानांकित शिरोळची संस्कृती सुतार, द्वितीय मानांकित शिरोळ ची सिद्धी बुबणे, बिगर म्हणा की कागलची श्रावणी व्हटकर व शाहूवाडी ची जानवी स्वामी या चौघीजणी चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. १४ वर्षाखालील मुलींच्या गटात चौथ्या फेरीनंतर अग्रमानांकित हातकणंगलेची मृणाल पांडव , द्वितीय मानांकित शिरोळची सिद्धी कर्वे, चंदगडच्या निधी पोटे व रसिका तेली या चौघीजणी चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.
Our Visitor
Views Last 30 days : 65
Total views : 549013