गणेश भक्तांसाठी आजपासून मंडळांचे देखावे पाहण्यास खुले

- घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी अबालवृध्दांची शहरासह उपनगरांमध्ये होणार गर्दी - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभारलेत लक्षवेधी भव्य काल्पनिक मंदिर, राजमहल आदींच्या प्रतिकृती - काही मंडळांकडून सादर होणार तांत्रिक, ऐतिहासिक, समाजप्रबोधनपर देखाव्यांचे सादरीकरण - शहर, शहरातील पेठांसह उपनगरात कोठे काय पहायला मिळणार याविषयी सविस्तर माहिती

कोल्हापूर  : (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

घरगुती गणेश मूर्तींचे विजसर्जनानंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेल्या भव्य लक्षवेधी, आकर्षक प्रतिकृती, तांत्रिक, ऐतिहासिक, समाजप्रबोधनपर देखावे पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहेत. रविवारपासून हे देखावे पाहण्यासाठी खुले करण्यात येणार असल्यामुळे शहरासह उपनगरांमध्ये गणेशभक्तांची पाहण्यासाठी गर्दी होणार आहे, यामुळे पुढील पाच दिवस संपूर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसरात्र गर्दीने फुलून जाणार असून गणेश भक्तांची वर्दळ सुरु राहणार आहे.
कोल्हापुर शहरात कोठे काय पहाल ?

शाहूपुरी, लक्ष्मीपुरी परिसर
व्हिनस कॉर्नर मित्रमंडळ, छ. राजाराम महाराज चौक : तिरुपती बालाजी सुप्रभात आरती तांत्रिक देखावा, त्रिमूर्ती गणेश मंडळ, उषा टॉकीज परिसर : प्रबोधनपर देखावा स्त्री भ्रूणहत्येचा राक्षस, श्री गणेश मित्र मंडळ व्यापार पेठ : ‘महाराष्ट्र पोलिस २४ तास सेवेत सजीव देखावा, शाहूपुरी युवक मंडळ : मैदानी खेळ तांत्रिक देखावा, राधाकृष्ण तरुण मंडळ : सातारा जलमंदिरातील शाहू महाराजांचा दरबार, स्वयंभू गणेश मंडळ लक्ष्मीपुरी : दख्खनचा राजा जोतिबाची १५ फुटी गणेश मूर्ती, लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मित्र मंडळ : पर्यावरणपूरक कायमस्वरूपी गणेशमूर्ती.
—————————————–
राजारामपुरी परिसर
दि गणेश फ्रेंडस सर्कल, एस. एफ ग्रुप टाकाळा : सोने – चांदीच्या आकर्षक दागिन्यांनी मडविलेली सुवर्ण गणेशमूर्ती, शिवाजी तरुण मंडळ राजारामपुरी, पहिली गल्ली : ओडिशा – पुरी येथील जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती, एकता मित्र मंडळ : विद्युत रोषणाईने नटलेले आकर्षक मंदिर, इंद्रप्रस्थ तरुण मंडळ, दहावी गल्ली : काल्पनिक मंदिर, राजारामपुरी जयशिवराय तरुण मंडळ, सहावी गल्ली : काळभैरव प्रतिकृती, भगतसिंग तरुण मंडळ : चिंतामणी मंदिर प्रतिकृती, जय मराठा तरुण मंडळ ट्रस्ट, चौथी गल्ली : सुवर्ण दगडूशेठ गणपती, राजारामपुरी स्पोर्ट्स, तिसरी गल्ली : दगडूशेठ गणेश व मंदिर प्रतिकृती, शिवाजी तरुण मंडळ राजारामपुरी पहिली गल्ली : ओडिशा-पुरी येथील जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती, दिगणेश फ्रेंड्स सर्कल, एस.एफ.ग्रुप टाकाळा : सोने-चांदीच्या आकर्षक दागिण्यांनी मडविलेली सुवर्ण गणेशमूर्ती.
—————————————–

मंगळवार पेठ, रविवार पेठ परिसर
कलकल तरुण मंडळ : आंध्र प्रदेश पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील शक्तिश्वर स्वामी मंदिराची प्रतिकृती, गडगडाट ग्रुप, वारे वसाहत बाईज : नरमुखी श्री आदिविनायक, प्राचीन शैलीतील त्रिमूर्ती गणेशमूर्ती, छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ : पारंपारिक शाडूची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि भव्य आकर्षक राजमहालची प्रतिकृती, जय पद्मावती तरुण मंडळ पद्मावती मंदिर : अमेरिका- कॅलिफोर्नियातील बाली शैलीतील कोरलेली मूर्ती, महालक्ष्मीनगर तरुण मंडळ : प्राचीन शैलीतील त्रिमूर्ती गणेशमूर्ती. पूलगल्ली तालीम मंडळ : भू अधिपती गणेशाची लक्षवेधी गणेशमूर्ती, विश्वशांती तरुण मंडळ सुभाष रोड : सिंहासनारुड भव्य व आकर्षक गणेशमूर्ती, दिलबहार तालीम मंडळ : १५ फूट उंचीची सर्व आयुधे परिधान केलेली गणेश मूर्ती व दख्खनचा राज दरबार.
—————————————-
शुक्रवार पेठ, उतरेश्वर पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ परिसर :
शुक्रवार पेठ तालीम मंडळ : महाराष्ट्र फिल्म कंपनीची आठवण करून देणारा देखावा व गणेशमूर्ती, जुना बुधवार पेठ तालीम मंडळ : सिंहासनारुढ भव्य गणेशमूर्ती, द्विमुखी मारुती भक्त मंडळ तोरस्कर चौक : वनराज रुपातील गणेशमूर्ती, मस्कुती तलाव तरुण मंडळ, पंचगंगा नदी रोड : अमरनाथ मंदिर गुंफा व शिवलिंग प्रतिकृती, अष्टविनायक मित्र मंडळ : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा देखावा, कमांडो फ्रेंड्स सर्कल : ‘बाप्पांना सोने-चांदी नको, भुकेलेल्यांना अन्न पाणी द्या’ देखावा, डांगे गल्ली तरुण मंडळ : अवयवदान, नेत्रदान विषयी देखावा, मस्कुती तलाव तरुण मंडळ, पंचगंगा नदी रोड : अमरनाथ मंदिर गुफा व शिवलिंग प्रतिकृती, सोल्जर ग्रुप : महाकाल देखावा.
* श्री महालक्ष्मी भक्त मंडळ अंबाबाई मंदिर : गरुड मंडपाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावटीने सजलेली पारंपरिक शाडूची गणेशमूर्ती, विद्यार्थी कामगार मित्र मंडळ, कायस्वरूपी फायबर गणेशमूर्ती विधायक लॉटरीतुन अंध संस्थेला मदतीचा उपक्रम.
—————————————-
शिवाजी पेठ परिसर
विद्यार्थी कामगार मित्र मंडळ : कायमस्वरूपी फायबर गणेश मूर्ती : विधायक लॉटरीतून अंध संस्थेला मदतीचा उपक्रम, महादेव तरुण मंडळ रंकाळा रोड : पौराणिक गुहा जयशिवराय मित्र मंडळ, लाड चौक : ऐतिहासिक देखावा, शिवशक्ती स्पोर्ट्सस खंडोबा तालीम रोड : विनोदी देखावा.
—————————————–
कसबा बावडा परिसर
शिवाजी कॉलनी मंडळ संकपाळनगर : भुताची गुहा, भारतवीर मित्र मंडळ चौगले गल्ली : बदलती लग्नपद्धती विषयावर सजीव देखावा स्वयंवर, गणेशपूजा मित्र मंडळ कवडे गल्ली : जगाचा पोशिंदा शिवकालीन व सध्याच्या शेतकरी यांची तुलना करणारा सजीव देखावा, जयभवानी तालीम मंडळ माळ गल्ली : तिरुपती येथील सुवर्णगिरी मंदिराची प्रतिकृती, संदीप स्पोर्ट्सस अबेडकरनगर : मालेश्वर येथील महादेव मंदिराची प्रतिकृती.
—————————————–
उपनगर परिसर
सद्गुरू बाळूमामा तालीम, फुलेवाडी रिंगरोड : गिरणार पर्वत, प्राचीन गुहा आणि भव्य शिवलिंग, राजे संभाजी मंडळ दौलतनगर : हैदराबाद येथील सुवर्णगिरी मंदिर प्रतिकृती अष्टविनायक ग्रुप सानेगुरुजी : विष्णुरूपातील पाण्यात प्रतिबिंब दिसणारी गणेशमूर्ती, ग्रुप सानेगुरुजी : शिवछत्रपती व सईबाई यांची शेवटची भेट झालेले महाबळेश्वर येथील कृष्णाबाई मंदिर प्रतिकृती, अक्षय मित्र मंडळ मार्केट यार्ड रोड : १ हजार १११ द्रोणांपासून साकारलेली लक्षवेधी गणेशमूर्ती, वास्तव ग्रुप आपटेनगर : नाशिक त्र्यंबकेश्वर मधील सीता कुटीची प्रतिकृती, भगवा चौक तरुण मंडळ विचारे मळा : पंचमुखी गणेशाची आकर्षक मुर्ती.
——————————————-
कोणत्या मंडळाने, साकारल्यात कोणत्या प्रतिकृती
मस्कुती तलाव तरुण मंडळ, पंचगंगा नदी रोड : अमरनाथ मंदिर
दिलबहार तालीम मंडळ, रविवार पेठ : बारा ज्योतिर्लिंग मंदिर
पंचगंगा तालीम मंडळ, शुक्रवार पेठ : कला महर्षी बाबुराव पेंटर यांना मानवंदना, जय भवानी तालीम मंडळ, माळ गल्ली, कसबा बावडा : तिरुपती येथील स्वर्णगिरी मंदिर, राजे संभाजी तरुण मंडळ, दौलतनगर : हैदराबाद येथील स्वर्णमंदिर, वास्तव ग्रुप, आपटेनगर : त्र्यंबकेश्वरमधील सीता कुटी, नाथागोळे तरुण मंडळ, शिवाजी पेठ : साताऱ्यातील ऐतिहासिक कल्याणगड.
—————————————–

Our Visitor

5 4 8 5 9 4
Views Last 30 days : 67
Total views : 549013

You may also like

error: Content is protected !!