श्रीशैल जगद्गुरूंची कोल्हापुरात इष्टलिंग महापूजा

कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष संतोष जंगम व वैभव जंगम यांची पत्रकार परिषदेत माहिती

कोल्हापूर -:  (लोकमानस न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्था, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित संस्कार शिबिर – २०२६ (१२ वे वर्ष) हे दि. १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विश्वपंढरी हॉल, हॉकी स्टेडियम, कोल्हापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरू आहे. दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी वीरशैव लिंगायत समाजातील पंचपीठांपैकी एक असलेल्या श्रीशैल जगद्गुरूंच्या शुभहस्ते इष्टलिंग महापूजा व आशीर्वचनाचा भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांतून वीरशैव लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, हा कार्यक्रम भक्तांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. अशी माहिती कार्याध्यक्षकोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष संतोष जंगम व वैभव जंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विविध धार्मिक विधींचे सखोल प्रशिक्षण

या शिबिरामध्ये गणेश याग, पुण्याहवाचन, नवग्रह पूजा, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, दत्तक विधान, श्राद्धकर्म, काशी उद्यापन, सोळा सोमवार उद्यापन, गुगुळ पूजन तसेच विविध धार्मिक विधींचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेले पुरोहित, विद्यार्थी आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले आहेत.

यांच्या पावन उपस्थितीने शिबिराची शोभा अधिक वाढली

शिबिरामध्ये गुरुवर्य ष. ब्र. १०८ डॉ. श्री. नीलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर, गुरुवर्य प. ब्र. १०८ श्री. शिवानंद शिवाचार्य महाराज वाळवा, गुरुवर्य ष. ब्र. १०८ श्री. महादेव शिवाचार्य महाराज वाई, गुरुवर्य प. ब्र. १०८ श्री. गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज (सुरगेश्वर मठ, नूल), गुरुवर्य घ. ब्र. १०८ श्री. रविशंकर शिवाचार्य महाराज रायपाटणकर तसेच प.पू. सद्गुरु श्री. माधवनाथ महाराज (विश्वपंढरी, कोल्हापूर) यांच्या पावन उपस्थितीने शिबिराची शोभा अधिक वाढली आहे.

तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून सखोल मार्गदर्शन

याशिवाय रुद्रस्तोत्र, संपूर्ण शांतिकर्म, तोडगे व उपाय, वीरशैव लिंगायत सोळा संस्कार, श्राद्धकर्म पद्धती, उदकशांती पाठ, वास्तुशास्त्र, हस्तरेषाशास्त्र, गादी पूजन विधी, रत्न, क्रिस्टल आणि रुद्राक्ष यांसारख्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून सखोल मार्गदर्शन केले जात आहे.

शिबिर यशस्वी करण्यासाठी यांचे  परिश्रम

वीरशैव लिंगायत समाजातील धार्मिक परंपरा, संस्कार आणि पुरोहितविद्या यांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित हे शिबिर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष दयानंद जंगम, उपाध्यक्ष दीपक जंगम, सचिव प्रसाद स्वामी, खजिनदार  वैभव जंगम तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

धर्म जोपासला पाहिजे,  धर्माचे आचरण केले पाहिजे

“प्रत्येकाने धर्म जोपासला पाहिजे आणि धर्माचे आचरण केले पाहिजे. त्यासाठीच या संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त वीरशैव लिंगायत समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक उपक्रमाला सहकार्य करावे.” असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष संतोष जंगम यांनी समाजबांधवांना केले आहे.

या पत्रकार परिषदेला अध्यक्ष दयानंद जंगम दीपक जंगम प्रसाद स्वामी दीपक स्वामी विकास जंगम संदीप जंगम अथर्व जंगम शुभम जंगम ओम जंगम शिवानंद जंगम समर्थ जंगम ओमकार जंगम आदी उपस्थित होते.

Our Visitor

5 4 8 5 4 3
Views Last 30 days : 75
Total views : 548916

You may also like

error: Content is protected !!