कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजीत महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल अजिंक्यपदसाठी केएसए कोल्हापूर महिला फुटबॉल संघ निवड चाचणी उषाराजे गर्ल्स हायस्कूल येथे मंगळवार दि ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सात वाजता घेण्यात येणार आहे.

(संग्रहित फोटो)
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जळगांव येथे दि. २२ ते २६ ऑगस्ट २०२६ या काळात महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला फुटबॉल अजिंक्यपद होणार आहेत. या अजिंक्यपदसाठी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचा महिला जिल्हा संघ पाठविण्यात येणार आहे. याकरिता केएसएच्या वतीने निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या संघ निवड चाचणीत सहभागी हाेण्यासाठी महिला फुटबॉल खेळाडूंचा जन्म दि. ३१ डिसेंबर २०१० रोजीचा किंवा अगोदरचा असणे आवश्यक आहे. तरी या निवड चाचणीकरिता उत्कृष्ट महिला खेळाडूंनी फुटबॉल किट व स्वत:च्या सत्यप्रत जन्म दाखल्यासह उषाराजे गर्ल्स हायस्कूल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन केएसएतर्फे महिला फुटबॉल खेळाडूंना करण्यात आले आहे.
Our Visitor
Views Last 30 days : 75
Total views : 548916