फोटो कॅप्शन : – शेतकरी कर्जमुक्ती व वीज बिल माफी संदर्भात आयोजीत पत्रकार परिषदेत माहिती देताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील . यावेळी आमदार अमल महाडिक, राहुल चिकोडे, महेश जाधव, विजय जाधव, नाथाजी पोवार आदी उपस्थित.
कोल्हापूर : ( लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
शेतकरी कर्जमुक्ती व वीज बिल माफी यामुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर पडला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतुन सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३७ हजार कोटींचा लाभ झाला आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांची ४८ हजार कोटींची वीजबिल थकबाकीही माफ करण्यात आली आहे., अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही ऐतिहासिक योजना आहे. जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. अशा शेतकन्यांना २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजबिल आकारले जात नाही. मात्र, त्यांची वीज वापराची ४८ हजार कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी घोषित केल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्याच्या थकीत वीज बिलाची पाटी पूर्णपणे कोरी होणार आहे. याबाबत नाम चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्याऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्याचे आभार मानले.
पुढे मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राष्ट्रीयकृत, व्यापारी, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. पूर्वीच्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. मात्र, नव्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तरी दोन लाख रुपयापर्यतची कर्जमाफी दिली जाणार आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा आणि २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक पडणार असला तरी कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कृषी क्षेत्रासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी सुमारे ९५ हजार कोटी खर्च केले जातात. कापसाची १३६ लाख क्विंटल खरेदी करून १० हजार ८८३ कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. सोयाबीनचे ६ लाख टन उत्पादन ३ हजार १९८ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले, तर कांदा खरेदीमुळे बाजारभाव स्थिर राहण्यास मदत, ठिबक सिंचनासाठी प्रलंबित २१७ कोटी रुपये लवकरच वितरित करण्यात येतील, तसेच कृषी समृद्धी योजनेतील उर्वरित निधी पुरवणी मागण्यांतून उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

या पत्रकार परिषदेला आमदार अमल महाडिक, माजी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, माजी प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष व नगरसेवक विजय जाधव, जिल्हाध्यक्ष ग्रामीण पश्चिम विभाग नाथाजी पोवार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .
Our Visitor
Views Last 30 days : 75
Total views : 548916