कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
विभागीय सुब्रतो मुखर्जी १७ वर्षाखालील मुली गटातील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्हा ( संजीवन विद्या.व छ.शिवाजी क.महा.) संघाने कोल्हापूर मनपा ( उषाराजे हायस्कूल) संघावर ३ – ० गोलने एकतर्फी मात करुन अजिंक्यपद पटकविले. राज्यस्तर फुटबॉल स्पर्धेसाठी संजीवन विद्यानिकेतन व छ.शिवाजी क.महाविद्यालय,कोल्हापूरच्या १७ वर्ष मुलींचा संघ कोल्हापूर विभागातून पात्र ठरला आहे.


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आणि संजीवन नॉलेज सिटी, पन्हाळा यांचे सहकार्याने सुरु असलेल्या १७ वर्षाखालील मुली गटातील विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा ( संजीवन विद्या.व छ.शिवाजी क.महा.) संघ विरुद्ध कोल्हापूर मनपा ( उषाराजे हायस्कूल) संघ यांच्यात अंतिम सामना खेळविण्यात आला. या अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्हा ( संजीवन विद्या.व छ.शिवाजी क.महा.) संघाने कोल्हापूर मनपा ( उषाराजे हायस्कूल) संघावर ३ – ० गोलने एकतर्फी मात केली अंतिम सामन्यात संजीवन कडून लंबचेवी नोरेबम,पूनम रोकडे,मालेनगेबी यंगत्रे यांनी गोल केले.

अंतिम विजयी कोल्हापूर जिल्हा ( संजीवन विद्या.व छ.शिवाजी क.महा.) संघ : श्रेया भाग्यवंत, आर्या संबळ, तनिया तोरेबंम, लंबचेबी नोरेबम, रिना सिंग, टिना नवरेम, गुणगुण अकोईजा, केलबीण, एरिना,देविया इरामे, पूनम रोकडे, पुजा गोवाला, कुमकुम, रेवा सोनवणे, मालेनगेबी यंगत्रे.
स्पर्धा संयोजन मा.जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचे मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, अजिंक्य चौगुले, साँकर रेफ्री असोसिएशनचे सचिव प्रदिप साळोखे, क्रीडा शिक्षक जयंत कुलकर्णी यांनी केले. तर पंच म्हणून गजानन मनगुतकर, निरंजन कमते,शरद शिर्के, ओंकार लोकरे, अक्षय मंडलिक, संकेत साळोखे, प्रसाद कोरडे यांनी काम पाहिले.
तत्पूर्वी, झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर जिल्हा ( संजीवन विद्या.व छ.शिवाजी क.महा.) संघाने सिंधुदुर्ग जिल्हा (श्री वासव विद्यालय, माणगाव) संघावर ४ – ० गोलने एकतर्फी मात करुन अंतिम फेरीत धडक मारली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा संघाकडून पूजा, निशिता, टिना, नंदिनी यांनी प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर मनपा ( उषाराजे हायस्कूल) संघाने सांगली जिल्हा (वि. स. पागे विद्यानिकेतन) संघावर १ – ० गोलने मात केली. यामध्ये कोल्हापूर मनपा संघाकडून सई नलवडेने एकमेव गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तृतीय क्रमांकासाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ विरुध्द सांगली जिल्हा संघ यांच्यात झालेला सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. या सामन्यावेळी सांगली जिल्हा संघ मैदानात उपस्थित न राहिल्याने सिंधुदुर्ग जिल्हा संघाला विजयी घोषित करण्यात आले.

दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आणि संजीवन नॉलेज सिटी, पन्हाळा यांचे सहकार्याने सुरु असलेल्या १७ वर्षाखालील मुली गटातील विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यांचा पहिल्या फेरीतील सामन्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे , पहिल्या सामन्यात कोल्हापूर जिल्हा ( संजीवन विद्या.व छ.शिवाजी क.महा.) संघाने रत्नागिरी जिल्हा (सेंट थॉमस स्कुल रत्नागिरी) संघावर ६ – ० गोलने एकतर्फी मात केली. कोल्हापूर संघाकडून मलंगंबी २, पूनम रोकडे २, लंबचेवी सिंग, निशीता निर्गनग्रोम, इचेबी मैरबम प्रत्येकी एक गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसऱ्या सामन्यात सांगली जिल्हा (वि. स. पागे विद्यानिकेतन) संघाने सांगली म.न.पा.( संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल) संघावर ८ – ० गोलने एकतर्फी मात केली. सांगली जिल्हा संघाकडून श्रद्धा पाटील, श्रावणी पाटील यांनी प्रत्येकी ३ गोल तर सृष्टी माने २ गोल करुन संघाला मोठ्या गोलफरकाने विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.
तिसऱ्या सामन्यात कोल्हापूर म.न.पा. ( उषाराजे हायस्कूल) संघाने सातारा जिल्हा ( श्रीमंत शिवाजीराजे इं.मे.स्कूल ) संघावर २ – ० गोलने मात केली. यामध्ये कोल्हापुर मनपा संघाकडून सई नलवडेने वैयक्तीक २ करुन संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
Our Visitor
Views Last 30 days : 83
Total views : 548754