कोल्हापूर : (लोकमानस न्यूज – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन व राजाराम कॉलेज यांच्या संयुक्त विद्यामने शनिवार दि २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत राजाराम कॉलेज जिमखाना हॉलमध्ये घेण्यात आली. या क्रिकेट फिटनेस मार्गदर्शन कार्यशाळेला कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यशाळेला महाराष्ट्र रणजी संघ पश्चिम विभागीय दुलीप ट्रॉफी संघ व १९ वर्षाखालील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे तज्ञ प्रशिक्षक महेश पाटील, एस ॲन्ड सी (स्द्रेंथ ॲण्ड कंडिशनिंग कोच) प्रशिक्षक यांनी उपस्थित खेळाडू प्रशिक्षक व पालक यांना मार्गदर्शन केले. या अंतर्गत त्यांनी क्रिकेट खेळांसाठी खेळाडूंचा शारीरीक फिटनेस, दररोजचा सराव व मॅच पुर्वी कशा प्रकारची तयारी, स्ट्रेचिंग, धावा काढताना कसे धावण्याची योग्य पध्दत, खेळताना होणा-या दुखापती होवु नये व झाल्यातर त्यावरील उपाय तसेच मॅच झाल्यानंतर शरीराची रिकव्हरी कशी करायची खेळाडूंचा आहार यांचे सविस्तर मार्गदर्शन प्रोजेक्टरव्दारे व प्रत्यक्ष मैदानावर प्रात्यक्षिकासह करण्यात आले.

कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात खेळाडू प्रशिक्षक व पालक यांच्या प्रश्नाचे व शंकाचे निरसन करण्यात आले. या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक महेश पाटील यांचे स्वागत संस्थेचे सहसचिव डॉ संजय पाठारे यांनी केले. यावेळी संस्थेचे माजी उपाअध्यक्ष रमेश हजारे, सीडीसी अध्यक्ष राजेश केळवकर, डॉ सुशांत महाजन, राजाराम कॉलेजचे संचालक शारीरीक शिक्षण व क्रिडा विभाग अथर्व देवण्णावर, मुद्दसर मुल्ला व सहभागी खेळाडूंसह प्रशिक्षक व पालक मोठया संख्येने उपस्थितीत होते.
Our Visitor
Views Last 30 days : 82
Total views : 548753